Nagpur News नागपूर : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)  हे कधी भाजपच्या बाजूने बोलतात, तर कधी त्यांच्या विरोधात बोलतात. तसेच ते कधी पवार साहेबांच्या बाजूने बोलतात तर कधी त्यांच्यावर टीका करतात. त्यांची भूमिका नेहमी बदलत राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे एकच आमदार आहे. अशी बोचरी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी केलीय. 


रोहित पवार हे आज नागपुरात (Nagpur News) असून त्यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. माझ्या मतदारसंघातून दोन नॅंशनल हायवे जाणार आहे. याबाबत चर्चा झाली. नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नेहमी मदत करतात. विकासकामात कुठेही राजकारण न आणता ते विरोधीपक्षातील लोकांनाही  मतद करतात. मतदारसंघातील विकास कामांबाबत ही भेट घेतली असून आमच्यात सविस्तर चर्चा झाल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. त्यावेळी ते बोलत होते. 


राज ठाकरे त्यांच्यावरची विश्वासहार्ता कुठेतरी कमी होत चालली आहे- रोहित पवार


राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कडे एक नाशिकची महानगरपालिका होती. मात्र नंतरच्या परिस्थितीत त्यांचं कोणीही निवडून आलं नाही, यावरूनच दिसते की त्यांच्यावरची विश्वासहार्ता कुठेतरी कमी होत चालली आहे. ते आज पवार साहेबांबद्दल बोलत आहे. काही दिवसापूर्वी ते मोदी साहेबांबद्दल बोलत होते. माझी त्यांना विनंती आहे की, भाजप एखाद्या पक्षाचा वापर दुसऱ्या पक्षाचे मत कमी किंवा विभागणी करण्यासाठी करत असतो. तुमचा तसा वापर होऊ नये. तुम्ही मराठी अस्मिता, संविधान आणि महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते आहात. त्यामुळे भाजप तुमचं फक्त मत खाण्यासाठी वापर करून घेईल, ते फक्त होऊ देऊ नका एवढी माझी त्यांना विनंती असल्याचेही रोहित पवार म्हणले. 




वरुन आदेश आला नको तिथेही नाचत बसायचं


शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी भाजपकडून आदित्य ठाकरेंच्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आलीय. तर यावेळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमणे-सामने आल्याचे बघायला मिळाले. यावर बोलताना  रोहित पवार म्हणाले की, भाजप कशाचं आणि कुठे आंदोलन करते, हे पण त्यांना कळत नाही. वरुन आदेश आला की इथे नाचत बसायचं, राज्यात सामान्य कुटुंबातील महिला सुरक्षित नाही आणि हे काल्पनिक विषय काढून आंदोलन करत आहे. कोणतं तरी काल्पनिक प्रकरण काढून आणि त्यावर आंदोलन करतात, हे भाजपच्या कार्यकर्त्यांनाही कळत नाही. कुठे आंदोलन करायचं आणि कशाचं करायचं ते ही त्यांना कळत नसल्याची टीका केलीय.


हे ही वाचा