Kolkata Doctor Case :  कोलकाता (Kolkata Case)  येथील सरकारी रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरचा बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर  (Resident Doctors) आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या कृत्याच्या निषेधार्थ राज्यातील मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur), छत्रपती संभाजीनगरसह  (Chhatrapati Sambhajinagar) इतरत्र त्याचे पडसाद आता उमटू लागले आहे.


कोलकाता प्रकरणात केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा, तसेच यातील आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी निवासी डॉक्टर सध्या करत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश निवासी डॉक्टरांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.


मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगरसह इतरत्र काम बंद


कोलकाताच्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज राज्यभरात या घटणेच पडसाद उमटताना दिसत आहेत. यात मुंबईतील सर्व निवासी डॉक्टरांचे अत्यावश्यक सेवा  वगळता इतर भागात आज काम बंद आंदोलन पुकरण्यात आले आहे. मुंबईतील नायर रुग्णालय, जेजे रुग्णालय, के ई एम रुग्णालयातील डॉक्टर कोलकत्ता येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज निदर्शने देत आहेत. या प्रकरणात केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा, तसेच यातील आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी निवासी डॉक्टर सध्या करत आहे. 


आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्या!


दुसरीकडे नागपुरातील शासकीय मेयो आणि मेडिकल या दोन रुग्णालयाचे डॉक्टर आजपासून संपावर जाणार आहेत. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या सेंट्रल मार्डने आज पासून देशभरात संप पुकारला आहे. डॉक्टर संपावर जाणार असल्याने शासकीय मेयो आणि मेडिकलमधील रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी, आकस्मिक सेवा आणि अतिदक्षता विभागाला या संपातून वगळण्यात आले आहे.  दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात देखील 600 पेक्षा अधिक निवासी डॉक्टर यांनी संपाची हाक दिली आहे. कोलकाता प्रकरणातील आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी निवासी डॉक्टर करत आहे. 


अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी - संजय राऊत 


कोलकाताच्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आहे. ममता बॅनर्जी ह्या संवेदनशील नेत्या आहेत. त्या या प्रकरणात हस्तक्षेप करत फास्ट ट्रॅकवर हा मुद्दा चालवून दोषींना नक्कीच शिक्षा देतील. असा विश्वास शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केला आहे.


हे ही वाचा