संतोषकुमार लष्करी सेवेतून 2012 साली निवृत्त झाले होते. संतोषकुमार यांच्या नावावर असलेली 12-बोअर रायफलद्वारे त्यांनी गोळी झाडल्याचे स्पष्ट झाले. या रायफलने त्यांनी राहत्या घराच्या अंगणात स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
दरम्यान, घटना घडली तेव्हा घरात कोणी नव्हते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्येपूर्वी संतोषकुमार यांनी चिठ्ठी लिहून, मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याचे आणि कुणाविषयीही तक्रार नसल्याचे नमूद केले आहे.