नांदेड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करा, अशी मागणी नांदेडमधील दलित तरुणांनी केली आहे. या तरुणांनी पोलिस उपअधीक्षकांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
कोपर्डी बलात्काराविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाजाचे मोर्चा निघत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले होते की, जनतेच्या प्रतिक्रिया दुर्लक्षित करण्यासारखी नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केलेली नाही. त्या कायद्याचा गैरवापर होत असेल, तर शासकीय यंत्रणांनी त्यामध्ये लक्ष घालून गैरसमज दूर करावे, असंही पवार म्हणाले.
तर दुसरीकडे "अॅट्रॉसिटीच्या संबंधातून पोलिसांनी शेकडो मुलांना घराबाहेर काढून मारलं. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यास तो रद्द करुन त्याऐवजी दुसरा कायदा आणावा," अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. शिवाय, "अॅट्रॉसिटीविषयी सर्वप्रथम मी बोललो. त्यानंतर शरद पवार बोलले. पण टीका माझ्यावरच झाली, असंही यावेळी राज म्हणाले.