Rashtriya Swayamsevak Sangh : मनोरंजनाच्या नावाखाली चित्रपट, टीव्ही, सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर ज्या पद्धतीची सामग्री प्रेक्षकांना दिली जात आहे, त्यामुळे महिला सुरक्षेसाठी धोका उत्पन्न होऊन कहर होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक केरळमध्ये सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) आणि संघाशी संबंधित सर्व संघटनांनी कोलकाता मधील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टर सोबत झालेलं बलात्कार आणि हत्येच्या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत, अशा घटना थांबवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना संदर्भात चर्चा केली.


आत्मरक्षणाचे धडे देणे आवश्यक-  सुनील आंबेकर


मनोरंजनाच्या नावाखाली सध्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर जी सामग्री उपलब्ध करून दिली जात आहे, त्यामुळे महिला सुरक्षितते संदर्भात कहर होत असल्याची प्रतिक्रिया संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे. सध्या चित्रपट, टीव्ही, सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाच्या नावाखाली ची सामग्री प्रेक्षकांसमोर उपलब्ध करून दिली जात आहे,  त्यामुळे महिला विरोधी घटनांना खतपाणी तर मिळतच आहेच, सोबतच देशातील अनेक महिला विरोधी घटनांचे  आरोपी अशी सामग्री तासानतास पाहणारे असल्याचेही समोर आले आहे. हे दुर्दैवी असून यावर नियंत्रण ठेवलेच पाहिजे. असेही आंबेकर म्हणाले.


दरम्यान, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण पद्धती, तसेच कौटुंबिक वातावरण जास्त संस्कारक्षम करण्याची गरज आहे असेही आंबेकर म्हणाले. शिवाय महिलांच्या सुरक्षिततेसाठी शालेय आणि  महाविद्यालयीन विद्यार्थिनी सोबतच नोकरदार महिलांना आत्मरक्षणाचे धडे देणे आवश्यक आहे. असे मत ही सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले.


जातीय जनगणनेचे राजकारण व्हायला नको -सुनील आंबेकर


कोणाच्या प्रगतीसाठी आवश्यक असेल तर जातीय जनगणना व्हायला हरकत नाही. मात्र, ⁠जातीय जनगणनेचे राजकारण व्हायला नको. ⁠राजकारणाच्या पलीकडे जाऊन जातीय जनगणनेवर विचार व्हावा, मात्र ⁠या मुद्द्यावर राजकारण व्हायला नको, अशी भूमिका ⁠राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बोलताना व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक केरळमध्ये सुरू आहे. तेथे ते बोलत होते. 


इतर महत्वाच्या बातम्या