Nagpur News नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University)  सुरू असलेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण नुकतेच वीएमवी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. सोनू जेसवानी यांनी समोर येत संघप्रणित शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहे.


कल्पना पांडे यांनी नागपूर विद्यापीठाला गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराचा अड्डा बनवल्याचा आरोप डॉ. सोनू जेसवानी यांनी केला आहे. कल्पना पांडे विद्यापीठाच्या वतीने विविध महाविद्यालयांच्या ऑडिट साठीच्या कमिटीमध्ये जाऊन अनधिकृत पद्धतीने महाविद्यालयाकडून पैसे उकळतात, असा गंभीर आरोप ही डॉ. सोनू जेसवानी यांनी केला आहे.


भाजपच्या नेत्यांचे नाव घेऊन कल्पना पांडे यांची विद्यापीठात मनमानी


भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांचे नाव घेऊन कल्पना पांडे नागपूर विद्यापीठात आपली मनमानीच करत नाही आहे. तर त्यांनी विद्यापीठाचे वातावरण अधिक दूषित केल्याचा आरोपही डॉ. सोनू जेसवानी यांनी केलाय. परिणामी, कल्पना पांडे यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केलीय.


विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी शिक्षण मंचाच्या अध्यक्षा कल्पना पांडे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना नियमबाह्य पद्धतीने पदावरून हटवण्यात आल्याचा आरोप केला होता. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतील काही भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चा प्रणित सदस्यांनी सुभाष चौधरी यांच्या विरोधात खोटे आरोप करून त्यांना एमकेसीएलच्या प्रकरणात अडकून, पदावरून निलंबित करवल्याचा आरोपही कल्पना पांडे यांनी केला होता. कल्पना पांडे यांच्या या आरोपामुळे नागपूर विद्यापीठात एका बाजूला संघ प्रणित शिक्षण मंच आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता युवा मोर्चा व अभाविपी अशी उघड लढाई समोर आली होती.


नागपूर विद्यापीठ पुन्हा चर्चेत


आता त्यात व्ही.एम.वी महाविद्यालयाच्या हिंदी विषयाच्या प्राध्यापिका डॉ. सोनू जेसवानी यांनी उडी घेत कल्पना पांडे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने नागपूर विद्यापीठातला हा संघर्ष  अधिक चिघळण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ चर्चेत आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय कारवाई केली जाते आणि हे प्रकरण कुठवर जातं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI