Nagpur News : धक्कादायक! नागपूर विद्यापीठात बनावट पदवीचे लोण! ट्रान्स्क्रिप्ट साक्षांकनादरम्यान भांडाफोड

Nagpur News : नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बनावट पदवीचे लोण आता नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पर्यंत पोहचल्याचे नव्यानं समोर आले आहे.

Continues below advertisement

Nagpur News नागपूर :  राज्याची उपराजधानी नागपूर (Nagpur News) शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात बनावट पदवीचे (Bogus Degree) लोण आता नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) पर्यंत पोहचल्याचे नव्यानं समोर आले आहे. यात  विद्यापीठात चक्क बनावट पदवी  (Fake Degree) आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोन संशयित आरोपी बनावट ट्रान्स्क्रिप्ट तयार करण्यासाठी बनावट पदवी घेऊन विद्यापीठात पोहचले होते. मात्र, दस्तावेज साक्षांकित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान विद्यापीठ प्रशासनाला ही बाब लक्षात आली आणि या प्रकारचा भांडाफोड झाला आहे. 

Continues below advertisement

आरोपी विरुद्ध विविध कलमान्तर्गत गुन्हा दाखल 

या प्रकरणी आंध्र प्रदेशातील एका संशयित आरोपीला रंगेहात पकडण्यात आले असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील रमनकुमार बंगारु आणि रतनबाबू मेकातोटी कांचरला कोटेश्वर अशी संशयित आरोपींची नावे आहेत. गुरुवारी हे संशयित आरोपी कांचरला रोशन या बॅचलर ऑफ इंजिनिअर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांच्या आठ ट्रांसस्क्रिप्ट, एक कोन्सोललीडेट ट्रान्स्क्रिप्ट आणि पदवीच्या साक्षांकनासाठी आले होते. दरम्यान, कागदपत्रांची पडताळणी केली असता नागपूर विद्यापीठाने जारी केलेल्या रेकॉर्डवर त्याची कुठलीच नोंद नसल्याची बाब समोर आली. दरम्यान, संशयित आरोपींची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे मिळाल्याने विद्यापीठ प्रशासनाला संशय आला आणि त्यांनी तात्काळ अंबाझरी पोलिसांना माहिती दिली. 

ट्रान्स्क्रिप्ट  साक्षांकनादरम्यान भांडाफोड

यादरम्यान रतन बाबू फरार झाला मात्र विद्यापीठ कर्मचार्‍यांनी रमण कुमारला अंबाझरी पोलिसांच्या हवाली केले. परीक्षा आणि मूल्यमापन संचालक डॉक्टर प्रफुल साबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपी विरुद्ध विविध कलमान्तर्गत गुन्हा दाखल केला. विद्यापीठातून पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध शहर राज्य किंवा देशात उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जातात. त्यांची उत्तर पत्रिका आणि पदवी अधिकृत आहे की नाही हे तपासण्यासाठी ट्रान्सस्क्रिप्ट तयार करण्यात येते. उत्तर पत्रिका आणि पदवींच्या छायांकित प्रती तपासून त्यावर 'व्हेरिफाइड' आणि 'फाउंड करेक्ट' असे साक्षांकित करून बंद लिफाफ्यात ती ट्रान्स्क्रिप्ट करून  विद्यार्थ्यांना दिली जाते. याच प्रक्रियेदरम्यान या प्रकरणाचा भंडाफोड झाला आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola