Nagpur News नागपूर : रस्त्यावरील बांधकामाच्या वेळेला कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहन चालकाचा अपघात झाला, किंवा त्यात कुणाचा जीव गेला तर संबंधित कंत्राटदारांविरोधात गुन्हे दाखल केले जातील. असा इशारा नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा कंत्राटदारांना दिला आहे. रस्त्याचे बांधकाम करणारे, उड्डाणपूल बांधणारे, तसेच सार्वजनिक ठिकाणी विविध विकासकामांचे कार्य करत असताना योग्य ती खबरदारी घ्यावी. या निर्वाधिन कार्यामध्ये कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी ही पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल (Dr. Ravinder Kumar Singal)यांनी नागपुरातील कंत्राटदारांना दिली आहे.
....तर संबंधित कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
कंत्राटदारांनी निर्माण स्थळी त्यांच्या कामामुळे कोणत्याही वाहन चालकाचा अपघात होणार नाही, वाहन चालक जखमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. बांधकाम स्थळी बांधकामाचे साहित्य व्यवस्थित पद्धतीने ठेवावे. जर कंत्राटदराच्या निष्काळजीपणामुळे नागपुरात कोणत्याही वाहन चालकाचा जीव गेला. तर संबंधित कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिला आहे.
नागपुरात दरवर्षी रस्ते अपघातात 300 पेक्षा जास्त वाहनचालकांचा मृत्यू होत आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने अपघात रस्त्यांचा, उड्डाणपुलाचा बांधकाम सुरू असताना त्याच्या अवतीभवतीच्या परिसरात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे मृत्यू थांबवायचे असल्यास कंत्राटदारांनी त्यांची जबाबदारी ओळखणे आणि सुरक्षित पद्धतीने काम करणे आवश्यक असल्याचेही पोलीस आयुक्त म्हणाले.
देशात दरवर्षी 5 लाख लोकांचा रस्ते अपघात मृत्यू
नागपुरात 800 ते 1000 लोकांचा दरवर्षी अपघातात मृत्यू होतो. देशात दरवर्षी 5 लाख लोकांचा रस्ते अपघात मृत्यू होतो. या अपघातात मृत्यमुखी होणारे 65% मृतक हे 18 ते 34 वयोगटातील आहे. परिणामी, नागपूर शहरात होणारे अपघात आणि या अपघतांसाठी कारण ठरलेले ब्लॅक स्पॉट शोधले आहेत. तसेच त्यावर सध्या काम सुरू असल्याच समाधान केंद्रीय वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले होते.
या सोबतच शाळेसमोरील होणारे अपघात रोखण्यासाठीही काम सुरू असल्याचेही गडकरी म्हणाले. तर अतिक्रमणामुळे पायदळ चालणाऱ्यासोबत हिट अँड रन मध्ये मृत्यूचा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे फुटपाथवरील अतिक्रमणवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी स्थानिकांनी केली होती. त्या पाठोपाठ आता नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल हे देखील रोड अपघातांना घेऊन अॅक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळाले असून, आता दोषींवर थेट कारवाईचा बडगा पोलीस उचलणार आहे.
हे ही वाचा