जालना : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत सुरु शेतकरी आंदोलनाबाबत मोठं वक्यव्य केलं आहे. शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याची अजब माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. याच देशांनी CAA च्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकवल असून भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन देखील दानवे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
जालना जिल्ह्यातील कोलते टाकली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. हे आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे असल्याचं सांगायला देखील रावसाहेब दानवे विसरले नाहीत. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष यावर काय प्रतिक्रिया देतात पाहावं लागेल.
नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आज 14 वा दिवस आहे. सरकारने शेतकर्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने काही प्रमाणात माघार घेण्याचे संकेत दिले होते. परंतु शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी हे स्पष्ट केले की कोणत्याही परिस्थितीत नवीन कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत.
मात्र केंद्र सरकारने बुधवारी दिलेल्या नव्या प्रस्तावात एमएसपीसह एपीएमसी कायद्यात बदल आणि खासगी प्लेअर टॅक्स चर्चा आहे. आंदोलक शेतकर्यांनी आपली भूमिका कडक केली आहे. ते म्हणाले की, सरकार कायदा मागे न घेण्याच्या आग्रहावर ठाम असेल तर शेतकरीदेखील निदर्शने करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :