Union Budget 2022 Update: मोदी सरकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे शून्य बजेट (Zero Sum Budget)असून त्यामधून कोणत्याही क्षेत्राला काहीही मिळालं नाही असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय. निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी हे वक्तव्य केलंय. 


काँग्रेस नेते राहुल गांधी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "मोदी सरकारचे हे बजेट म्हणजे शून्य बजेट आहे. त्यामध्ये वेतनदार वर्ग, मध्यम वर्ग, गरीब आणि दुर्बल, युवक, शेतकरी आणि लघु, मध्यम उद्योगांना कोणताही फायदा झाला नाही." 






स्वस्त झालेल्या गोष्टी : 



  • परदेशातून येणाऱ्या मशिन्स स्वस्त होतील

  • कापड आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होतील

  • शेतीची अवजारं स्वस्त होतील

  • मोबाईल - चार्जर

  • शूज - चपला

  • हिऱ्याचे दागिने


महाग झालेल्या गोष्टी : 




  • छत्री 


अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा : 



  • आरबीआयचे डिजिटल चलन

  • चिप असलेले पासपोर्ट

  • ईलेक्ट्रिक वाहन बॅटरी अदलाबदली धोरण

  • देशात 60 लाख नव्या नोकऱ्या

  • पोस्टात कोअर बँकिंग सुविधा

  • रसायन, कीटनाशकमुक्त शेतीला प्राधान्य

  • संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी 25 टक्के बजेट

  • शालेय शिक्षणासाठी 100 टीव्ही वाहिन्या

  • 2022 मध्ये 5 जी सेवा सुरु करणार

  • 3.8 कोटी घरांमध्ये नळाचं पाणी

  • मालमत्ता नोंदणी कुठूनही करण्याची सुविधा

  • क्रिप्टो करन्सी कमाईवर 30 टक्के कर




संबंधित बातम्या: