Indian Coast Guard Day 2022 : भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard Day) 46 व्या स्थापना दिनानिमित्त जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. भारतीय लष्करी जवान स्वत:चा जीव धोक्यात ठेवून सागरी किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी अतुलनीय कामगिरी बजावतात. याच त्यांच्या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तटरक्षक दलाला शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime minister Narendra Modi) यांनी ट्वीट करत असं म्हटलं आहे की, भारतीय तटरक्षक परिवाराला त्यांच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. "आमचे कोस्ट गार्ड हे व्यावसायिकांचे उत्कृष्ट संघ आहे, जे आमच्या किनार्यांचे स्थिरपणे संरक्षण करतात आणि मानवतावादी प्रयत्नांमध्येही आघाडीवर असतात." असे म्हणत त्यांनी कौतुक केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Atul Shah) यांनी, संस्थेच्या जवानांचे भारतीय किनारे सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या अतुलनीय वचनबद्धतेबद्दल कौतुक केले."त्यांच्या स्थापना दिनानिमित्त, मी आमच्या धाडसी भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या शुभेच्छा देतो. भारतीय किनारे सुरक्षित करण्यासाठी, समुद्रातील मानवी जीवन वाचवण्यासाठी आणि आमच्या सागरी जैवविविधतेचे जतन करण्याच्या त्यांच्या अतुलनीय बांधिलकीला आम्ही सलाम करतो. असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister of IndiaRajnath Singh) यांनी म्हटले आहे की, मला हे लक्षात घेता आनंद होत आहे की, भारतीय तटरक्षक दल 1 फेब्रुवारी 2022 रोजी 45 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. भारतीय तटरक्षक दल भारताच्या सागरी क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेले एक शक्तिशाली सागरी दल म्हणून स्वत:ला ठामपणे प्रस्थापित केले आहे. पुढे ते म्हणाले, आज भारतीय किनारपट्टी गार्ड हे जगातील सर्वात मान्यताप्राप्त समकालीन तटरक्षक दलांपैकी एक आहे.
इंडियन कोस्ट गार्ड (ICG) ही भारताची सागरी कायद्याची अंमलबजावणी आणि शोध आणि बचाव एजन्सी आहे. 1978 साली, 18 ऑगस्ट रोजी तटरक्षक कायदा, 1978 द्वारे भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत स्थापना करण्यात आली. परंतु एक वर्षाच्या आधी म्हणजेच 1977 मध्ये, 1 फेब्रुवारीला आणीबाणीमुळे, तस्करी रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार, दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात भारतीय तटरक्षक दिन साजरा केला जातो.
संबंधित बातमी :
Indian Coast Guard दिन म्हणजे नेमकं काय? आणि तो का साजरा करतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha