Budget 2022 : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी युवक महिला आणि शेतकरी या सर्वांबाबतीत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात महत्वाचं म्हणजे निर्मला सीतारमण यांनी  PM गतीशक्ति मास्टर प्लान  2022-23  (PM Gati Shakti Master Plan)या विषयी माहिती दिली. या मास्टर प्लॅनमुळे लोकांना जलद प्रवास करता येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. 


PM गतीशक्ति मास्टर प्लान
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की एक्सप्रेसवेसाठी पीएम गती शक्ती मास्टर प्लॅन 2022-23 तयार केला जाईल. त्यांनी सांगितले की , 2022-23 मध्ये  राष्ट्रीय महामार्गांचा 25,000  किलोमीटरपर्यंत विस्तार केला जाणार आहे. जनतेच्या सोई-सुविधांसाठी 20,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. माहितीनुसार, नॅशनल मास्टर प्लॅन अंतर्गतबंदरे, उडान, आर्थिक क्षेत्र आणि रेल्वे वाहतूक सुविधांच्या बाबतीत एकमेकांशी जोडले जातील.  तसेच स्थानिक व्यवसाय आणि पुरवठा साखळींना मदत करण्यासाठी ‘वन स्टेशन-वन प्रॉडक्ट’ संकल्पना राबवली जाईल.






 बजेटमधील आतापर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे 
आत्मनिर्भर भारत योजनेमुळे 16 लाख रोजगाराच्या संधी
तर मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख रोजगार उपलब्ध
पुढील आर्थिक वर्षात 9.2% विकास दर अपेक्षित आहे 
ऊर्जा, वाहतूक, विपणन यावर भर दिला जाईल
पुढील आर्थिक वर्षात 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवणार
येत्या 3 वर्षात 400 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार 
शहरी वाहतूक रेल्वे मार्गाशी जोडणार


 







महत्त्वाच्या बातम्या:


Budget 2022 Housing: घरांसाठी 48 हजार कोटींचे पॅकेज, 2023 पर्यंत 80 लाख नवी घरं बांधणार


Education Sector Budget 2022 : शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन 100 चॅनेलची घोषणा, मातृभाषेत शिक्षण मिळणार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha