औरंगाबाद : महाराष्ट्रात राज्यकर्ते पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करतात, पण पेट्रोलचे भाव केंद्र सरकार नाही तर अमेरिका ठरवते, असा अजब दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये ते बोलत होते. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांचं कंबरडं मोडलं असताना रावसाहेब दानवे यांनी हा जावाईशोध लावला आहे. 


देशातील इंधनाच्या वाढत्या किंमतीवरुन आणि महागाईवरुन रविवारी काँग्रेसने मोर्चा काढला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे यांनी हे अजब वक्तव्य केलं आहे. देशात आणि राज्यात पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत, पण आपण  यावर काही बोलणं योग्य नाही असं सांगत रावसाहेब दानवे म्हणाले की, "पेट्रोलचे दर हे आता जागतिक बाजाराशी लिंक केलेले आहेत. त्यामुळे या किंमती वाढण्यामागे केंद्र सरकारचा हात नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती या रोज खाली-वर होतात. या किंमती आता अमेरिकेत ठरवल्या जातात. त्यामुळे केंद्र सरकारला यावरुन दोष देणं चुकीचं आहे."


केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरचे कर कमी केल्याने त्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व्हॅट कमी करत नाहीत असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. 


महागाई काय पंतप्रधानांनी वाढवली का? विक्रम गोखलेंचा सवाल
महागाई काय पंतप्रधान मोदींनी वाढवली का, असा उलट प्रश्न ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केला. अनेकजण हॉटेलमध्ये जाऊन एकाच वेळी 10 हजार रुपये खर्च करतात. ओपेकमध्ये तेलाचे दर किती झाले हे माहित आहे का, एक माणूस 70 वर्षांची साचलेली घाण साफ करत आहे हे दिसत नाही का, अशा वेळी त्याच्या पाठिशी उभे रहायला हवं. पंतप्रधान मोदी देशासाठी काम करतात तेव्हा पाठिंबा आहे. मात्र, पक्षासाठी करत असतील तर पाठिंबा नाही, असेही विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे. 


संबंधित बातम्या :