मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर आपण आपली बाजू मांडली, सर्व वस्तुस्थिती ठेवली, आता सविस्तर भूमिका 8 ऑगस्ट रोजी स्पष्ट करणार असं ग्लोबल टीचर अवॉर्ड (Global Teacher Award) विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी म्हटलं आहे. डिसले गुरुजींनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.


मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर डिसले गुरुजी म्हणाले की, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर आज सर्व वस्तुस्थिती मांडली, त्यांच्यासमोर सर्व कागदपत्रं ठेवली. त्यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या सर्व प्रकरणावर मी 8 ऑगस्टला भूमिका मांडणार आहे."


मुख्यमंत्र्यांचे निर्देश
आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, डिसले गुरुजी आज मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले.  मुख्यमंत्र्यांनी डिसले यांचं म्हणणं ऐकूण घेतलं आहे. कुठल्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये त्यांना त्रास होऊ नये, याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. 


जागतिक पुरस्कार विजेते सोलापूरचे शिक्षक रणजीत डिसले यांनी राजीनामा दिला आहे. 6 जुलै रोजी रणजितसिंह डिसले यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्यासंदर्भातील पत्र शिक्षण विभागाकडे दिले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नावलौकिक करणाऱ्या शिक्षकाला शासनाची नोकरी का सोडावी वाटली हा या निमित्ताने उपस्थित झालेला प्रश्न आहे. डिसले यांच्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या :