Ranjitsinh Disale Guruji News : आंतरराष्ट्रीय अवार्ड (Global Teacher Award) मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज ग्लोबल टीचर्स अवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डिसले गुरुजींच्या चौकशीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, डिसले गुरुजी आज मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी डिसले यांचं म्हणणं ऐकूण घेतलं आहे. कुठल्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये त्यांना त्रास होऊ नये, याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. चुकीचे काम होऊ नये याबाबत सर्व आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं.
ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे 2017 ते 2020 या काळात गैरहजर असल्याची माहिती खोटी निघाल्यानंतर आता त्यांच्यावर (Disale Guruji)केलेला स्वत:चा पगार स्वत: काढल्याचा आरोपही खोटा असल्याचं समोर आलं आहे. समितीचा (Solapur ZP) निष्कर्ष आहे की, प्रभारी मुख्याध्यापक कदम यांनी सांगितलं की, शालार्थ वेतन प्रणालीचा आयडी आणि पासवर्ड डिसले यांच्याकडे होता. त्यावरुन डिसले यांनी स्वत:चा पगार परस्पर काढून घेतला असं मुख्याध्यापक कदम यांनी सांगितल्याचं त्या अहवालात म्हटलं आहे. मात्र खुद्द कदम यांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या खुलाश्याचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. ज्यात कदम यांनी स्पष्ट म्हटलं आहे की, डिसले यांच्या प्रतिनियुक्तीच्या आदेशात उल्लेखित केल्याप्रमाणे त्यांचे वेतन मूळ आस्थापनेवरुन करण्याचे आदेश होते. त्यानुसार त्यांचे वेतन मूळ आस्थापनेवरुन गटशिक्षणाधिकारी यांनी अदा केले आहे, असे या खुलाश्यात म्हटले आहे.
हा होता आरोप
कदम यांनी दिलेल्या पत्रात हे देखील म्हटलं आहे की, अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापक यांन वेतन काढण्याबाबत कोणतेही आदेश गटशिक्षणाधिकारी अथवा वरिष्ठ कार्यालयाने मला दिलेले नाहीत. डिसले यांच्या वेतनाबाबत वरिष्ठांनी मला दिलेल्या सर्व आदेशांचे तंतोतंत पालन करण्यात आलेलं आहे, असं या खुलाश्यात म्हटलं आहे.
हे आहे सत्य
डिसले यांच्यावर शिल्लक रकमेचं विवरण दिलं नसल्याचा आरोपही खोटा
डिसले यांच्यावर शिल्लक रकमेचं विवरण दिलं नसल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. मात्र कॅशबुकचे अवलोकन केले असता डिसले यांनी शिल्लक रकमेचे विवरण दिलेले दिसून येत आहे. या कॅशबुकवर डिसले यांनी खर्चाचं विवरण सविस्तर दिल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्यामध्ये व्यवहार डिसले यांच्या सहीने झाले असून त्यातील पावत्यांची रक्कम आणि पासबुकवरील शिल्लक असलेली रक्कम समान असल्याचं सांगितलं आहे.
शिल्लक रकमेबाबत हा होता आरोप
हे आहे सत्य
आधी गैरहजर असल्याचा दावा खोटा आता वेतनासंदर्भातही प्रशासन तोंडघशी
रणजितसिंह डिसले हे 2017 ते 2020 या काळात गैरहजर असल्याचा ठपका जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या फेरतपासणी अहवालात ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे हा निष्कर्ष खोटा असल्याचा दावा डिसले यांनी केला आहे. समितीचा निष्कर्ष आणि डिसले यांचा दावा याची पडताळणी एबीपी माझानं केली तेव्हा वेगळीच माहिती समोर आली. सोलापूरच्या विज्ञान केंद्रात रणजितसिंह डिसले यांनी काम केल्याची माहिती क्यूरेटर राहुल दास यांनी दिली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेनं विज्ञान केंद्राला एक पत्र दिलं असून त्यात डिसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचा तपशिलही देण्यात आला आहे. त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूटमध्येही डिसले यांनी काम केल्याची माहिती महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला त्याचा पगार स्वत: काढता येत नाही
आधी गैरहजेरी नंतर आता वेतन आणि खर्चाच्या विवरणाचा डिसले यांच्यावरील आरोप खोटा निघाला आहे. मुळात कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला त्याचा पगार स्वत: काढता येत नाही. अशात प्रशासनाचा हा आरोपच मुळात हास्यास्पद वाटत आहे. डिसले यांच्या प्रशासकीय चुका कशा झाल्या, याची चौकशी करुन त्यांच्याकडून पगारापोटी घेतलेले 17 लाख वसूल करण्याचा शिक्षण विभागाचा इरादा आहे. दुसरीकडे या सरकारी कारवाई आणि चौकशीला कंटाळून डिसलेंनी राजीनामा धाडलेला आहे. एका प्रयोगशील शिक्षकाची किंमत परदेशातल्या लोकांनी ओळखली आपण मात्र तो कुठे चुकला हेच हेरुन त्याला नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाही आहोत. प्रयोगशीलतेला टाचेखाली चिरडण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरु असल्याचं दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Ranjitsinh Disale : डिसले गुरुजींचा राजीनामा, अपयश कोणाचे? व्यवस्थेचे की काही नवं करू पाहणाऱ्यांचे
- Girish Mahajan : राजीनामा देऊ नका, देवेंद्र फडणवीसांचं डिसले गुरुजींना बोलावणं
- Ranjitsinh Disale : रणजित डिसलेंच्या वेतनवसुलीचा निर्णय घाईगडबडीने घेणार नाही, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI