Raj Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांचाच असल्याचं जाहीर केलं. हा उद्धव ठाकरे यांना हा सर्वात मोठा धक्का आहे. तसचे उद्धव ठाकरेंचा हा सर्वात कठीण प्रसंग आहे. एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर भाजप आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही ट्वीट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.  राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं, असी चपरक राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावली आहे. 


नाव आणि पैसा
पैसा येतो, पैसा जातो
पुन्हा येतो...


पण एकदा का नाव गेलं की 
परत येत नाही


ते येऊ शकत नाही
काळ्या बाजारासुद्धा मिळायचं नाही 


म्हणून नावाला जपा
नाव मोठं करा


- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे



पाहा व्हिडीओ







केंद्रीय निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा धक्का दिला.  शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील पक्षाला देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील दाव्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली होती. 


आज आयोगाने निर्णय देताना लक्षात घेतलेलेल मुद्दे -


जुन्या सादिक अली (तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष) प्रकरणाचा हवाला, काँग्रेसमध्ये तेव्हा पडलेली फूट आणि इंदिरा काँग्रेसला बहुमताच्या आधारे आयोगाने दिली होती मान्यता. तेव्हा पहिला निकष बहुमताचा पहिला निकष मानला गेला. तर दुसरा निकष लक्ष्य आणि उद्दिष्टांची चाचणी हा होता.


१. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला अपात्रतेचा निर्णयाची कक्षा तसंच ही सुनावणी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात सुनावणी प्रलंबित असणे या बाबी आणि निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्हाबाबतच्या असणाऱ्या तरतूदी या वेगळ्य़ा बाबी.
२. शिवसेना पक्षात फूट पडली
३. बहुमताची चाचणी आणि संघटनेतील बहुमत याचाही विचार.  
४.२०१८ साली झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड प्रतिनिधी सभेने केली होती त्यामुळे संघटनेत ठाकरे गटाला बहुमत आहे हा मुद्दा ग्राह्य धरला गेला नाही.
५. त्यामुळे निवडणुकीत कोणत्या गटाला किती मतं मिळाली या मुद्द्यावर भर...
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी झालेल्या उमेदवारांना  पडलेल्या ४७ लाख ८२ हजार ४४० मतांपैकी शिंदे गटाच्या ४० आमदारांना ७६ टक्के म्हणजे ३६ लाख ५७ हजार ३२७ मतं पडली होती. या तुलनेत ठाकरेगटाच्या १५ आमदारांना अंदाजे २४ टक्के म्हणजे ११ लाख २५ हजार ११३ मतं पडली होती.
तसंच शिवसेनेला एकूण मिळालेल्या ९० लाख ४९ हजार ७८९ मतांपैकी शिंदे गटाला ४० टक्के तर ठाकरे गटच्या १५ आमदारांना १२ टक्के मतं आहेत.