Kubereshwar Dham : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) सिहोर (Sehore) येथील कुबरेश्वर धाम (Kubereshwar Dham) येथे एका धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. अति प्रचंड गर्दीमुळे तब्येत बिघडल्यामुळे हजारो जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच, या दरम्यान भाविकांच्या चेंगराचेंगरीमुळे शेकडो महिला भाविक अजूनही बेपत्ता आहेत. आज या गर्दीत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका महिलेची तब्येत बिघडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पण, कुबरेश्वर मंदिर इतकं प्रसिद्ध का आहे? या ठिकाणी रूद्राक्षाला इतकं महत्त्व का आहे? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


भाविकांच्या श्रद्धेचं स्थान कुबरेश्वर मंदिर 


मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबरेश्वर धाम (Kubereshwar Dham) हे भगवान शिवला समर्पित एक मंदिर आहे. कुबरेश्वर धाम ही महादेवाची पवित्र भूमी आहे. या मंदिराची पंडित प्रदीप मिश्रा यांच्या संस्थेमार्फत विठ्ठलेश सेवा समितीद्वारे स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी भगवान शिवच्या दर्शनासाठी भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. कुबरेश्वर मंदिर हे दिसायला खूप सुंदर आहे. मंदिराच्या खाली एक सभामंडप आहे. ज्यामध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांचं व्यासपीठ आहे. या ठिकाणी बसून पंडित प्रदीप मिश्रा भाविकांना उपदेश करतात. 


रूद्राक्षाच्या माळेचं महत्त्व काय?


शिवमहापुराणात रूद्राक्ष महोत्सवाचा उल्लेख आहे. एकमुखी पासून ते एकवीस मुखीपर्यंत रूद्राक्षाचं वर्णन यामध्ये दिलं आहे. भगवान शिवाचा एक आनंदमय भाव म्हणून याचं वर्णन केलं जातं. रूद्राक्षाचा उपयोग औषधी गुणधर्म म्हणून देखील केला जातो. गळ्यात रूद्राक्षाची माळ पण घातली जाते. तसेच, सनातन धर्माची एक निशाणी म्हणून देखील रूद्राक्षाच्या माळेकडे पाहिलं जातं. आनंदाचा भाव म्हणजेच भगवान शिव हे आमच्या बरोबर आहेत या रूपात देखील रूद्राक्षाच्या माळेचं विशेष महत्त्व आहे. यावर्षी 48 लाख रूद्राक्ष आम्ही वितरण करण्यासाठी आणले आहेत. 


पंडित मिश्राचा हा रुद्राक्ष का आहे खास?


कुबरेश्वर धाम येथे वाटण्यात येणारा रुद्राक्ष पाण्यात टाकून ते पाणी प्यावे, असे केल्याने त्यांच्या सर्व समस्या दूर होतील, अशी श्रद्धा येथे येणाऱ्या भाविकांची आहे. तुमच्यावर जर अशुभ नक्षत्र असेल, कोणत्या आजाराने तुम्ही त्रस्त असाल, किंवा तुम्हाला जर भूतबाधा झाली असेल तर या रूद्राक्ष माळेने तुमची सर्व संकटं दूर होतील असा विश्वास इथल्या भाविकांमध्ये आहे. यासाठीच दरवर्षी हा रुद्राक्ष खरेदी करण्यासाठी अनेकांची गर्दी या ठिकाणी जमलेली असते. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Kubeshwar Dham Sehore : धार्मिक आयोजनादरम्यान गोंधळ, हजारो लोकांची गर्दी; अनेक महिला बेपत्ता