मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट आला असून एकीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि दुसरीकडे महायुती (Mahayuti) असताना सर्वजण मनसेच्या (MNS) भूमिकेकडे डोळे लावून बसले होते. मनसे भाजपसोबत जाणार अशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा होतीच, त्यात आता बंद दाराआड झालेल्या बैठकीची भर पडली आहे. मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई आणि संदीप देशपांडे या तिघांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि पुन्हा मनसे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. 


मनसे नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरूवारी तर सोमवारी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याचं समोर येतंय. आता भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी आणि मनसे ही नवी युती होणार का? ही युती झाली तर काय फॅार्म्युला असेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचं लोकसभेत मिशन 45 आहे, त्यासाठी सर्वच पक्षांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची रणनीती आहे. त्यात लोकसभेत मनसैनिक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसू शकतात. 


मनसेच्या निवडणुकीचा इतिहास



  • पक्षस्थापनेनंतर मनसेनं 2009 साली पहिली लोकसभा निवडणुक लढवली. 

  • मनसेनं 2009 साली 13 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते.

  • 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं लाखापेक्षा जास्त मतं घेतली होती.

  • त्यानंतर 2014 साली मनसेनं थेट मोदींना पाठिंबा दिला होता. त्यामुळे मनसेनं आपला एकही उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उभा केला नव्हता.

  • 2019 साली राज ठाकरेंनी भूमिका बदलली. राज ठाकरेंनी 2019 साली लाव रे व्हिडीओ ची संकल्पना आणली आणि राज्यातल्या व केद्रसरकावर राज ठाकरेंनी आगपाखड केली.

  • 2019 साली राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुक लढवली नाही. 


याआधी देखील मनसे आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा रंगली होती. पहिली टाळी कोण कोणाला देतंय यावरून राजकीय वातावरणात मनसे आणि शिवसेनेची हवा झाली होती. 2014 साली राज आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्याचे प्रयत्न करण्यात आले होते, पण ते काही शक्य झालं नव्हतं.  त्यानंतर मनसेनं पुढाकार घेतला आणि उद्धव ठाकरेंना पहिला टाळी दिली.  


2017 साली मनसेचे महत्त्वाचे नेते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना थेट युतीचा प्रस्ताव दिला होता. पण त्यानंतर ती चर्चाच पुढे गेलीच नाही. स्वतः राज ठाकरेंनी हा किस्सा सर्वांना सांगितला होता.


महाराष्ट्रातलं राजकारण अस्थिर झालीय, 2019 साली सत्तेसाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली तर 2022 साली सत्तोसाठीच महायुती तयार झाली. 2024 हे वर्ष निवडणुकांचे आहे, या वर्षात लोकसभा विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सत्तेचा सोनेरी मुकुट शिरपेचात खोवायला सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. त्यात मनसे आता महायुतीत सामील झालं तर आश्चर्य वाटायला नको. 


ही बातमी वाचा: