मुंबई : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचे (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्यासाठी  राज ठाकरेंना कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ही माहिती एबीपी 'माझा'ला माहिती दिली आहे. राज ठाकरेंना राम मंदिराच्या उद्धाटनाचं  निमंत्रण दिल्याची माहिती भाजप नेते गिरीश महाजनांनी दिली होती. त्यानंतर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली आहे. 


राम मंदिराच्या लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. काल गिरीश महाजनांच्या वक्तव्यानंतर एबीपी माझाने राज ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीने एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. राज ठाकरेंना अद्याप निमंत्रण आलेले नाही. परंतु निमंत्रण लवकरच येण्याची शक्यता आहे. निमंत्रण आल्यानंतर राज ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार का? हा देखील सवाल आहे.  कारण या पूर्वी राज ठाकरेंनी अयोध्या दौरा आखला होता. मात्र  ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मण होऊ नये, म्हणून राज ठाकरेंनी अयोध्या दौरा टाळला होता. त्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी राम मंदिराचे अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले होते. आता जर राम मंदिर ट्रस्टकडून निमंत्रण आले तर राज ठाकरे उद्घाटन सोहळ्याला जातील, अशी माहिती राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांनी एबीपी माझाला दिली आहे. 


राज ठाकरेंना निमंत्रण आल्यानंतर त्यांच्यासोबत कोण जाणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. निवडणूक आयोगाने  मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना राम जन्मभूमी प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे. 


काय म्हणाले होते गिरीश महाजन? 


गिरीश महाजन म्हणाले, केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नसतील मात्र राज ठाकरे असतील. अयोद्धेच्या राम मंदीरावरुन आमच्यावर टीका केलीय त्यांना बोलवण्याचं कारण काय? उद्धव ठाकरेंचं अयोद्धेच्या राम मंदिराच्या उभारणीत काय योगदान हे सर्वांना माहिती आहेत. ते साधे एमएलसी तेही पहिल्या टर्मचे आहेत. त्यामुळे कदाचित केंद्राच्या व्हीव्हीआयपींच्या लिस्टमध्ये ते नसतील किंवा आणखी काही कारण असेल. 


निमंत्रणावरुन नाराजी नाट्य?


ठाकरे गटाचे नेते आणि खासदार यांनी म्हटलं होतं की, आम्हाला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण येणार नाही. अडवाणींना ज्यासाठी आमंत्रण दिलं गेलेलं नाही त्याचं कारणास्तव आम्हाला आमंत्रण दिलं गेलेलं नाही. कारण आमचं त्याच योगदान आहे. आम्ही त्या प्रकरणातले आरोपी आहोत.  ज्यांचं काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार काही नाही अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. परंतु विश्वस्त समितीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


हे ही वाचा :