Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत होणार हे निश्चित आहे. यावर आता काँग्रेस नेते बाळासाहेबत थोरात ((Balasaheb Thorat) ) यांनी राज्यसभेची सहावी जागा महाविकास आघाडी जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यसभेची सहावी जागा महाविकास आघाडी लढवणार आणि जिंकणार असा विश्वास  बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. 


राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात चर्चा झाली. परंतु, त्यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली असल्यामुळे भाजप आणि शिवसेनेत आता सहाव्या जागेसाठी थेट लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीचे चाहरी उमेदवार जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे.  
 
 बाळासाहेब थोरात म्हणाले, "राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणारं हे निश्चित झालं आहे. भाजपला दोन जागा मिळणार आहेत. ते त्यांचा कोटा पूर्ण करत आहेत. महविकास आघाडी चौथी जागा निवडून आणणार आहे. आम्ही भाजप सोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीकडून देण्यात आलेली ऑफर  त्यांनी मान्य केली असती तर नक्कीच आनंद झाला असता. निवडणूक सुरू झाली की अनेक बाबी समोर येतात. यासाठी ज्येष्ठांनी मिळून निर्णय घ्यायला हवा होता, त्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन सहाव्या जागेबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भाजपने आमची ऑफर नाकारली. त्यामुळे सहाव्या जागेसाठी आता निवडणूक होईल. ही जागा शिवसेनेला गेली असली तरी आम्ही सर्व जण या जागेसाठी मदत करणार आहोत. त्यामुळे सहावी जागा आम्ही लढवू आणि ती जिंकू देखील". 


"काही अपक्ष भाजपकडे असले तरी बहुसंख्य अपक्ष हे महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की, राज्यसभेची चौथी जागा देखील महाविकास आघाडी जिंकेल हे निश्चित आहे. भाजपकडील काही अपक्ष आम्हाला मदत करतील. बहुसंख्य अपक्ष आमच्याकडे  असून अपक्षांची आम्ही व्यवस्थित काळजी घेतली आहे. त्यामुळे आम्ही विजयी होणार आहोत, असा विश्वास बाळासाबेह थोरात यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 


महत्वाच्या बातम्या


Rajya Sabha Election 2022: राज्यसभेसाठी मविआची ऑफर भाजपने धुडकावली; चंद्रकांत पाटील म्हणतात...