Hingoli News Update : हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे तलाव भरले आहेत. त्याचबरोबर सिद्धेश्वर ईसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सततच्या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी देखील वाढली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 118 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे बोरावेल ओसंडून वाहत आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील शेतकरी त्र्यंबकराव लोंढे यांच्या शेतातील बोरवेल देखील ओव्हरफ्लो झाला आहे. बोरवेलमधून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भविष्यातील पाणी प्रश्न मिटला  आहे.  बीडमध्ये देखील बिना लाईटचे बोरवेल ओसांडून वाहत आहेत.  


बीडमध्ये बिना लाईटचे बोरवेल ओसांडून वाहू लागले
बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं मोठं थैमान घातलं असून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. तर दुसरीकडे माजलगाव तालुक्यामध्ये पाणी पातळी वाढल्याने अनेक गावातील बोरवेलमधून पाणी वाहताना दिसत आहे. गेल्या वर्षी देखील याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे बोअरमधील पाणी जमिनीवरून वाहताना पाहायला मिळालं होतं.  या वर्षी देखील आता परतीच्या पावसानं जमिनीतली पाणी पातळी वाढली असून बोरवेल्स ओसंडून वाहू लागले आहेत. 


बीड जिल्ह्यात सध्या पाऊस थांबला असला तरी बोरवेल्स ओसंडून वाहत असल्याने अनेक शेतामधलं पाणी अद्यापही बाहेर निघालेलं नाही. या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना भविष्यात होणार असला तरी सध्या मात्र शेतात असलेल्या पिकाचे नुकसानच होतय. 


मागच्या वर्षी मराठवाड्यात 42 बोअरवेल ओव्हरफ्लो 


मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षी देखील मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे मराठवाड्यात मागच्या वर्षी तब्बल 42 ओअरवेल ओव्हरफ्लो झाले होते.  उन्हाळ्यात बोरवेल कोरडेठाक असतात. त्याच बोरवेलचे पाणी बिना लाईट कनेक्शनचं ओसंडून वाहत होतं. यंदा देखील अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे. 


शेतकऱ्यांचं मोठं नुकसान


दर वर्षी दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात यंदा परतीच्या पावसाने चांगलाच दुमाकूळ घातला. पाण्यासाठी धावाधाव करणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र या परतीच्य पावसाने मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिकं पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यावर आस्मानी संकट ओढावलं आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. परंतु, अनेक शेतकऱ्यांना सरकारची ही मदत पोहोचली नाही. 


महत्वाच्या बातम्या


दोन महिन्यांचा संसार उद्धवस्त, विजेच्या खांबाला चिकटून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू