Dudhsagar Waterfalls :  दूधसागर धबधब्याकडे (Dudhsagar Waterfalls) जाण्यास रेल्वे पोलीस (Railway Police) आणि  वन खात्याने बंदी घातली असून त्या बद्दल रेल्वेमध्ये पोलिसांच्याकडून घोषणा केली जात आहे.  दूधसागर धबधबा येथे अतिउत्साही पर्यटकांना मागच्या वर्षी प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि वनविभागाने या धबधब्यावर जाण्यास पर्यटकांवर बंदी घातली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशसानाकडून सांगण्यात येत आहे. 


दूधसागर धबधबा दक्षिण गोव्यातील धारबांदोडा तालुक्यातील कुळे येथे हा दूधसागर धबधबा आहे. दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी रेल्वे मार्गाच्या बाजूने चालत जावे लागते. धबधब्याकडे रेल्वेची वेग कमी होतो त्यावेळी काही पर्यटक आपला जीव धोक्यात घालून खाली उतरतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 


दूधसागर स्टेशनवर उतरल्यास रेल्वेच्या कलम 147  नुसार कारवाई 


यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना दूधसागर धबधब्याकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. रेल्वे पोलीस रेल्वेमध्ये ध्वनिक्षेपकावरुन दूधसागर स्टेशनवर कोणीही उतरु नये असे आवाहन करत आहेत. कोणी प्रवासी तेथे उतरल्यास रेल्वेच्या कलम 147  नुसार कारवाई करण्यात येईल असे रेल्वे पोलीस सांगण्यात येत आहे. 


शनिवारी आणि रविवारी हा धबधबा पाहण्यासाठी कर्नाटक,महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो पर्यटक येतात. त्यामुळे मागील रविवारी धबधबा पाहायला निघालेल्या पर्यटकांना रेल्वे स्थानक परिसरात रोखून धरले होते. पण बंदी घातली असताना काही पर्यटकांनी धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा रेल्वे प्रशासनाकडून त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली होती. 


अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय 


सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे दूधसागर धबधबा ओसंडून वाहत आहे. त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. पण हा धबधबा रेल्वेच्या अगदी जवळ असल्याने रेल्वेची सतत ये-जा सुरु असते. त्यामुळे अनेकदा येथे अपघात घडत असतात. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. 


या बंदीमुळे आता पर्यटकांना दूधसागर धबधब्याचा अनुभव घेता येणार नाही. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळत आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हे पाऊल उचलव्याचं पाहायला मिळत आहे. तसेच जर कोणी या धबधब्यावर जाण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीवर कठोर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 


हे ही वाचा : 


Marathwada Rain Update : मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात 148 मंडळांमध्ये अतिवृष्टी; सर्वाधिक पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात