रायगड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojna) वचनपूर्ती सोहळ्याचा तिसऱ्या टप्प्यातील शुभारंभ आज रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात होतोय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जाणाऱ्या महिलांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. 20 फूट खोल दरीत ही बस कोसळली आहे.
माणगावमधील धनसे क्रीडांगणावर जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी लाडक्या बहिणींना आणण्यासाठी हजारो बसेस एसटी महामंडळाच्या या रायगड जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये महिलांना घेऊन येत आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील काही महिलांना घेऊन येत असताना एका बसचा मांजरोने घाटात अपघात झाला आहे.यामध्ये काही महिला जखमी झाल्या आहेत. ही बस म्हसळा येथून माणगावकडे येतं असताना बाजूच्या दरीत घसरल्याने हा अपघात झाला आहे. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
कोणीतीही जीवीतहानी नाही
सुदैवाने महिला या अपघातामध्ये कोणीतीही जीवीतहानी झालेली नाही. एसटी घेऊन गेलेलं चालक हे नवीन असल्यानं मुख्य वळणावरिल हा अंदाज न आल्यान हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. जवळजवळ 20 फूट खोल दरीमध्ये ही बस कोसळली आहे.
महिलांना आत्तापर्यंत मिळाले 7500 रुपये
राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत.
10 एकर जागेवर या कार्यक्रमाची जय्यत तयारी
माणगाव तालुक्यातील माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्गावरील धनसे मैदानावर पार हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. सुमारे 50 हजार नागरिकांची बासण्याची आसन व्यवस्था होईल एवढी तयारी या मैदानात करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना दिवाळी आधीच या कार्यक्रमातून मुख्यमंत्री बहिणींना भाऊबीज भेट देणार असल्याचे बोललं जातंय. त्यामुळे लाडक्या बहिणींना देखील या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे. जवळजवळ 10 एकर जागेवर या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. 500 पोलिस तैनात करण्यात आलेले आहे .
हे ही वाचा :