Live Updates Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या सभेकडे उद्धव ठाकरेंची पाठ, उद्या शेगावला जाणार नाहीत

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेचा राज्यातील आज 11 वा दिवस आहे. ही यात्रा विदर्भात दाखल झाली आहे. जाणून घ्या या यात्रेतील अपडेट्स

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Nov 2022 12:26 PM
राहुल गांधींच्या सभेकडे उद्धव ठाकरेंची पाठ, उद्या शेगावला जाणार नाहीत

Bharat jodo Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची उद्या शेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नाहीत. उद्धव ठाकरे त्यांच्या सभेला जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.   

राहुल गांधींच्या सभेकडे उद्धव ठाकरेंची पाठ, उद्या शेगावला जाणार नाहीत

Bharat jodo Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची उद्या शेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नाहीत. उद्धव ठाकरे त्यांच्या सभेला जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.   

भारत जोडो यात्रा कोणीच थांबवू शकणार : यशोमती ठाकूर

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा ही कन्याकुमारीवरून सुरु झाली आहे. ही यात्रा श्रीनगरला जाऊन थांबणार आहे. या यात्रा आता कोणीच थांबवू शकणार नसल्याचे मत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं. 

आदिवासी बांधवांसोबत मेधा पाटकर भारत जोडो यात्रेत सहभागी

Bharat Jodo Yatra : जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर आज भारत जोडो यात्रेत नंदुरबार येथील आदिवासी बांधवांसोबत सहभागी झाल्या. काल राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची एक तास वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. 

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव पारंपारिक नृत्य सादर करत भारत जोडो यात्रेत सहभागी

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या भारत जोड यात्रेमध्ये आपल्याला वेगवेगळे पारंपारिक नृत्य व त्याचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. आज नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव आपले पारंपारिक नृत्य सादर करत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. 

Akola News: राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेसाठी येणाऱ्या लक्सरी बसचा अपघात, चार जण गंभीर जखमी

Bharat Jodo Yatra Akola:  काँग्रेस नेते राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेसाठी येणाऱ्या लक्सरी बसचा अपघात झाला आहे. सोलापूरहुन अकोल्यासाठी कार्यकर्ते निघाले होते. या बसमध्ये महिला प्रवासी होत्या. अकोल्यातील बाळापूरजवळ हा अपघात झाला. अपघातात चौघे गंभीर जखमी झाले आहेत. तर, महिला कार्यकर्त्यां ही अपघातात जखमी झाले. बसमध्ये 30 ते 35 काँग्रेस कार्यकर्ते प्रवास करत होते. जखमींवर बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव सहभागी

Bharat Jodo Yatra :  भारत जोडो यात्रा अकोला (Akola) जिल्ह्यात असून सकाळी सहा वाजता पातूर येथून  या यात्रेला सुरुवात झाली आहे. वाळेगाव मार्गे ही यात्रा बाग फाटा इथे पोहोचणार आहे. बाळापूर तालुक्यातील बाग फाटा इथे आज यात्रेचा मुक्काम असणार आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे. अकोला जिल्ह्यातील राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव सहभागी झाले आहेत.

भारत जोडो यात्रेचा विदर्भात आज दिसरा दिवस, अकोल्यातील पातूर येथून यात्रेला सुरुवात

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज विदर्भातील तिसरा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा 11 वा दिवस आहे. आज ही यात्रा अकोला जिल्ह्यात असून सकाळी सहा वाजता पातूर येथून  या यात्रेला सुरुवात झाली आहे. वाळेगाव मार्गे ही यात्रा बाग फाटा इथे पोहोचणार आहे. बाळापूर तालुक्यातील बाग फाटा इथे आज यात्रेचा मुक्काम असणार आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे.

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील नववा दिवस, यात्रा विदर्भात दाखल

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील नववा दिवस आहे. ह यात्रा विदर्भात दाखल झाली आहे.

Bharat Jodo Yatra : एक हजार वारकरी रिंगण सोहळा करुन राहुल गांधी यांचं बुलढाण्यात स्वागत करणार

Bharat Jodo Yatra : अकोला आणि बुलढाण्याच्या सीमेवरील जवळा वरखेड या गावातील जवळपास एक हजार वारकऱ्यांनी राहुल गांधींच्या स्वागताची तयारी केलेली आहे. विठ्ठलाच्या मूर्तीभोवती रिंगण सोहळा आयोजित करुन राहुल गांधी यांचं स्वागत केलं जाणार आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Bharat Jodo Yatra: वाशिम जिल्ह्यातील राजगाव येथे पायी चालत असताना गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एकजण गंभीर जखमी

Bharat Jodo Yatra: वाशिम जिल्ह्यातील राजगाव येथे  पायी चालत असताना गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एकजण गंभीर जखमी झाला आहे. गंभीर व्यक्तीला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून वाशिम इथं उपचारासाठी केले दाखल

Bharat Jodo Yatra: वाशिम जिल्ह्यातील राजगाव येथे पायी चालत असताना गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एकजण गंभीर जखमी

Bharat Jodo Yatra: वाशिम जिल्ह्यातील राजगाव येथे  पायी चालत असताना गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एकजण गंभीर जखमी झाला आहे. गंभीर व्यक्तीला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून वाशिम इथं उपचारासाठी केले दाखल

राहुल गांधींच्या पदयात्रेचा फायदा अकोला आणि वाशिम जिल्ह्याला, मेडशी-पातूर रस्त्याचं काम सुरु

Bharat Jodo : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचा काँग्रेसला कितपत फायदा होईल? यावर देशभर चर्चा सुरु आहे. मात्र, राहुल गांधींच्या पदयात्रेचा फायदा अकोला आणि वाशिम जिल्ह्याला जोडणाऱ्या मेडशी-पातूर रस्त्याला झालाय. गेल्या पंधरा दिवसांपासून या रस्त्याचे काम युद्धपातळीवर दिवसरात्र सुरू आहे. मेडशी ते पातूरदरम्यानचा 16 किलोमीटरचा रस्ता बांधणीसाठी सध्या वेगानं काम सुरू आहे. राहुल गांधींची भारत जोडो पदयात्रा 16 नोव्हेंबरला वाशिम जिल्ह्यातील मेडशीवरून अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये प्रवेश करणार आहे. मेडशी ते पातूर हा प्रवासात जंगल असल्यानं सुरक्षेच्या कारणामुळं राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. हा मार्ग अपुर्ण असल्यानं धुळीचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता. मात्र, राहुल गांधींसाठी हा रस्ता करण्यात येत आहे. 

राहुल गांधी यांचा घोंगडी देऊन सत्कार 

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा आज कळमनुरीहून हिंगोलीत दाखल झाली आहे. दरम्यान खानापूर चित्ता गावाच्या जवळ आल्यावर अनेक धनगर बांधवांनी ढोल वाजवून राहुल गांधी यांचे स्वागत केले. तर या दरम्यान राहुल गांधी यांनी धनगर बांधवांच्या गळ्यातील ढोल स्वतः घेत ढोल वाजवला. दरम्यान धनगर बांधवांनी सुद्धा राहुल गांधी यांचा घोंगडी देऊन सन्मान केला आहे. 

धनगर बांधवांकडून राहुल गांधी यांचा घोंगडी देऊन सत्कार, राहुल यांनी ढोल वाजवला

Bharat Jodo Yatra in Hingoli : भारत जोडो यात्रा आज कळमनुरीहून हिंगोलीत दाखल झाली आहे. दरम्यान खानापूर चित्ता गावाच्या जवळ आल्यावर अनेक धनगर बांधवांनी ढोल वाजवून राहुल गांधी यांचं स्वागत केलं आहे. तर या दरम्यान राहुल गांधी यांनी धनगर बांधवांच्या गळ्यातील ढोल स्वतः घेत ढोल वाजवला. दरम्यान धनगर बांधवांनी सुद्धा राहुल गांधी यांचा घोंगडी देऊन सन्मान केला आहे.

Rahul Gandhi : 'भारत जोडो यात्रे' मधून राहुल गांधी घेणार ब्रेक! 22 नोव्हेंबरला गुजरात दौरा, पक्षाचा करणार प्रचार

Rahul Gandhi : काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) 22 नोव्हेंबरला गुजरातमध्ये (Gujarat Election) प्रचार करणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेतून विश्रांती घेतल्यानंतर ते गुजरातला जाणार आहेत. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

राहुल गांधींच्या स्वागतासाठी 10 हजार स्क्वेअर फूट रांगोळी

Bharat Jodo Yatra :  हिंगोली शहरामध्ये भारत जोडो यात्रा दाखल झाली आहे. या यात्रेत पायी चालणाऱ्या सर्व भारत यात्रींचे लक्ष केंद्रित करत आहे ती म्हणजे शहरात काढलेली 10 हजार स्क्वेअर फूट काढलेली रांगोळी. 100 क्विंटल रांगोळीचे रंग वापरुन ही रांगोळी काढण्यात आली आहे. 20 कारागिरांनी 2 दिवस मेहनत करुन ही रांगोळी काढली आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिला राहुल गांधींना भेटणार

Bharat Jodo Yatra :  राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिला राहुल गांधींना भेटणार आहेत. अकोला जिल्ह्यातील पातुर येथे भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींची भेट होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातल्या दहा शेतकरी विधवा प्रतिनिधिकपणे राहुल गांधींना भेटणार आहे. राहुल गांधींकडे यांच्याकडे शेतकरी आत्महत्यांचं वास्तव आणि शेतीचे प्रश्न‌ मांडणार आहेत. यावेळी  राहुल गांधींना पारंपारिक 38 प्रकारच्या बियाण्यांची भेट देण्यात येणार आहे. लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्व शेतकरी विधवांची भेट होणार आहे.

कडाक्याच्या थंडीत भारत जोडो यात्रा सुरू, हिंगोलीकरांचा मोठा प्रतिसाद 

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा आज 65 वा दिवस आहे. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा दाखल झाल्यानंतर मोठा प्रतिसाद मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. आज सकाळीच कडाक्याच्या थंडीत भारत जोडो यात्रा निघाली आहे. या यात्रेत राज्यातील अनेक काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी राहुल गांधी यांच्यासोबत चालत आहेत.  

Bharat Jodo Yatra in Hingoli : बंजारा समाजाचे लोकनृत्य आणि लोकगीत सादर करुन राहुल गांधी यांचे हिंगोलीत स्वागत होणार

Bharat Jodo Yatra in Hingoli : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा आता काहीच वेळामध्ये हिंगोली शहरात दाखल होणार आहे. जालन्याचे आमदार राजेश राठोड यांच्या वतीने बंजारा समाजाचे लोकनृत्य आणि लोकगीत सादरीकरण करुन राहुल गांधी यांचं स्वागत केले जाणार आहे.

100 क्विंटल रंग वापरुन हिंगोलीत साकारली भारत जोडो यात्रेची 10 हजार स्क्वेअर फुटांची भव्य रांगोळी

Bharat Jodo Yatra in Hingoli : हिंगोली शहरामध्ये भारत जोडो यात्रा दाखल झाली आहे. या यात्रेत पायी चालणाऱ्या सर्व भारत यात्री यांचे लक्ष्य केंद्रित करत आहे ती म्हणजे शहरात काढलेली 10 हजार स्क्वेअर फुटांची रांगोळी. 100 क्विंटल रंग वापरुन ही रांगोळी काढण्यात आली आहे. 20 कारागिरांनी 2 दिवस मेहनत करुन ही रांगोळी पूर्ण केली.

Bharat Jodo Yatra in Hingoli : राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी विश्वजीत कदम यांच्या नेतृत्त्वात दहा हजार नागरिक सांगलीवरुन हिंगोलीत दाखल

Bharat Jodo Yatra in Hingoli : आज सकाळी कडाक्याच्या थंडीमध्येही भारत जोडो यात्रा सुरु झाली आहे. या भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी सांगलीवरुन हजारो नागरिक हिंगोलीत दाखल झाले आहेत. माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात हे कार्यकर्ते हिंगोलीत पोहोचले आहेत. विश्वजीत कदम हे सांगलीकरांच्या वतीने राहुल गांधी यांचे स्वागत करणार आहेत. 

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील सातवा दिवस

Bharat Jodo :  राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा सातवा दिवस आहे. राज्यात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे. युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

मी शेतकरी, भारत जोडो यात्रेत चालताना माझे पाय दुखत नाहीत : नाना पटोले

Bharat Jodo : देशात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा निघाली आहे. राहुल गांधी या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहेत. त्यांच्यासोबत भारत जोडोमध्ये पायी चालणं राज्यातील अनेक नेते मंडळींना शक्य होत नाही. तब्बेतीमुळं अनेकांनी राहुल गांधी यांच्यासोबत चालण्याचं टाळलं आहे. परंतू यात राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत, ते नाना पटोले. तेलंगणामधून महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा दाखल झाल्यापासून नाना पटोले राहुल गांधींसोबत सतत चालत आहेत. सर्व सत्रातील लोक राहुल गांधी यांच्यासोबत चालत असल्याचे पटोले म्हणाले. राज्यातील काही नेत्यांना तब्बेतीची अडचण असल्यामुळं चालत नसल्याचे पटोले म्हणाले. मी शेतकरी आहे चालताना माझे पाय दुखत नाहीत असेही ते म्हणाले. दिवंगत राजीव सातव यांनी आम्ही सगळेजण मिस करत असल्याचे पटोले म्हणाले.


 

राहुल गांधी यांनी कोल्हापुरी कुस्ती बघितली, मल्लांचे मानले आभार
Bharat Jodo :  भारत जोडो पदयात्रेत सतेज पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातून भगवे फेटे घालून हजारो जण पदयात्रेत सहभागी झाले आहेत. कोल्हापूरची ओळख असलेल्या कुस्तीतील मल्लसुद्धा या यात्रेत सहभागी झाले आहेत. या मल्लांना बघून राहुल गांधी पदयात्रेतून आखड्याच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी मल्लांची कुस्ती बघितली. त्यांच्याशी हात मिळवून मल्लांचे आभार मानले. आखाडा बाळापूर परिसरातील ही घटना आहे.
राहुल गांधी यांच्या यात्रेला कळमनुरीमध्ये चांगला प्रतिसाद
Bharat Jodo : हिंगोली जिल्ह्यात काल राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले होते. रात्रीच्या मुक्कामानंतर आज सकाळीच सहा वाजता राहुल गांधी यांची भारत जोडो सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत नाना पटोले, एच के पाटील, विश्वजीत कदम पायी चालत आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेला कळमनुरीमध्ये चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. 
रत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा सहावा दिवस

Bharat Jodo : भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा सहावा दिवस आहे. राज्यात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ही यात्रा काल नांदेड जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे

 भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी बसच्या मोठ्या रांगा 

Bharat Jodo : नांदेड जिल्ह्यातील चार मुक्काम आणि 120 किमीचा प्रवास पूर्ण करत भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. हिंगोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य स्वागत करत भारत जोडो महाद्वारातून यात्रेने हिंगोली जिल्ह्याकडे मार्गक्रमण केलं आहे. दुपारच्या सत्रात शिवसेना नेते आदित्य ठाकरेही राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. जवळपास 2 किमीचा प्रवास भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांनी पूर्ण केला. परिसरातील नागरिकांनी देखील  या यात्रेत आपला सहभाग नोंदवलाय. यात्रेत सहभागी होण्यासाठी एसटी महामंडळच्या बसेसच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. 

संविधान आणि लोकशाहीसाठी लढत आहोत; आदित्य ठाकरेंचा भारत जोडो यात्रेतून भाजवर हल्लाबोल 

Bharat Jodo : संविधान आणि लोकशाहीसाठी लढत आम्ही आहोत. महाराष्ट्रामध्ये आलेले सरकार घटनाबाह्य आहे. अशाच वागणुकीमुळे आपल्या घटनेला  आणि लोकशाहीला या देशात धोका आहे. मी आज भारत जोडो यात्रेत सहभागी होत असलो तरी आणि आम्ही दोन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारांचे असलो तरी लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.  कधीकाळी इंदिराजी आणि बाळासाहेब प्रणव मुखर्जींसाठी एकत्र आले होते. 

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या दोन जणांना आयशर टेम्पोची धडक, एकाचा मृत्यू तर एक जखमी

Bharat Jodo :  भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या दोन जणांना आयशर टेम्पोने धडक दिली आहे. या धडकेत एक जण ठार झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. काल रात्री ही घटना नांदेड - अकोला महामार्गावरील अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव जवळ घडली. राहुल गांधी यांची सभा संपल्यानंतर पिंपळगावकडे जात असताना हा अपघात झाला. गणेश असे मृत्यू झालेल्यांचे नाव आहे.  ते तामिळनाडू राज्यातील होते. तर त्यांसोबतचा सायलू हा गंभीर जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कांग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी जखमीची जिल्हा शासकीय रुग्णालयात जावून भेट घेतली.

भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यात 120 किमीचा प्रवास, चार वाजता हिंगोलीत दाखल होणार

Bharat Jodo : भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील पाचवा दिवस आहे. आज नांदेड जिल्ह्यातील 120 किलोमीटरचे अंतर पार होत आहे. आज दुपारी चार वाजता यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल होणार आहे. दरम्यान, आज दुपारी तीन वाजता नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरील चोरांबा फाटा इथे शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे भारत जोडो यात्रेत सामील होणार आहेत. राहुल गांधीसोबत दोन किलोमीटर पायी चालतील. एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे शिवसेना-काँग्रेस आज एकत्र येत आहे. गांधी-ठाकरे साथ -साथचा आवाज देत, भारत जोडो यात्रेत आज सोबत चालतील. 

दुपारी चार वाजता आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

Bharat Jodo : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज 65 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा पाचवा दिवस आहे. ही यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात पोहोचणार आहे. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. दुपारी चार वाजता आदित्य ठाकरे यात्रेत उपस्थिती लावणार आहे.

18 नोव्हेंबरला राहुल गांधींची शेगावात होणार मोठी सभा, पाच ते सहा लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता

Bharat Jodo :  खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान 18 नोव्हेंबरला शेगावात एक मोठी सभा होणार आहे. या सभेचं नियोजन व तयारी सुरू झालेली आहे. शेगाव येथील बाळापूर मार्गावर आनंद सागरजवळ एका 25 एकर शेतामध्ये ही सभा होणार आहे. या सभेला जवळपास पाच ते सहा लाख लोक उपस्थित राहणार असल्याने त्यानुसार या सभेचे नियोजन करण्यात येत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते शेगाव येथे तळ ठोकून असल्याने या सभेचे नियोजन आतापासून सुरू झालं आहे.

राहुल गांधींनी आपल्या समस्या सांगण्यासाठी पोतराज, वैदू समाजातील महिला यात्रेत सहभागी

Bharat Jodo :  भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यातील आजचा चौथा दिवस फार विशेष राहणार आहे. ज्यात आज महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा होणार आहे. यात्रेत लोकांचा सहभाग वाढत आहे. आज या यात्रेत भटक्या विमुक्त समाजातील महिला-पुरुषांनी मुलाबाळांसह सहभाग नोंदवला आहे. ज्यात अंगावर कोडे मारुन घेणारे पोतराज, तर डोक्यावर मणी, पोत, बांगड्या घेऊन फिरणाऱ्या महिला सहभागी झाल्या होत्या. राज्यातील रहिवाशी नागरिक असूनही आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, राहण्याची नसलेली व्यवस्था नसल्याने मुलाबाळांसह पिढ्यानपिढ्या उघड्यावर जीवन जगत आहेत. त्या समस्या एकदा राहुल गांधींना सांगायच्या आहेत, आशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 


 

राहुल गांधींची आज नांदेडमध्ये जाहीर सभा, महाविकास आघाडीतील नेते राहणार उपस्थित

Bharat Jodo :  राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची "भारत जोडो" यात्रेला महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात चौथ्या दिवशी ही यात्रा नांदेड शहरात पोहोचली असून या यात्रेची महाराष्ट्रातील पहिली सभा आज नांदेड इथं होणार आहे. दरम्यान काँग्रेसचा गढ असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात या जाहीर सभेला मोठी गर्दी होणार आहे. राहुल गांधींच्या या जाहीर सभेत महाविकास आघाडी सरकारमधील मोठे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री जयंत पाटील, मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, एच के पाटील, बाळासाहेब थोरात, राजू वाघमारे, सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, नाना पटोले आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.

भारत जोडो यात्रेत महिला रणजी क्रिकेट संघातील खेळाडूही सहभागी

Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रातील नांदेडमधून सुरु झालेल्या भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. या यात्रेत डॉक्टर, इंजिनिअर, वकील, राजकीय नेत्यासह खेळाडूही दाखल झाले आहेत. ज्यात गेल्या चार दिवसांपासून नागपूर येथील काँग्रेसच्या नेत्या नॅश नुसरत अली या देखील भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत ही यात्रा पादाक्रांत करत आहेत. भारतीय रणजी क्रिकेट संघाच्या महिला खेळाडू असणाऱ्या नॅश नुसरत अली या महाराष्ट्रभर ही यात्रा करणार आहेत. डिऑन नॅश या फास्ट बॉलरच्या नावे नुसरत अली यांचे टोपण नाव क्रिकेटर श्रीनाथ यांनी नॅश नुसरत अली असे ठेवलं आहे.

Rahul Gandhi Rally in Buldhana : 18 नोव्हेंबरला शेगावात राहुल गांधी यांची सभा

Rahul Gandhi Rally in Buldhana : खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान 18 नोव्हेंबरला बुलढाण्यातील शेगावामध्ये मोठी सभा होणार आहे. या सभेचं नियोजन आणि तयारी सुरु झालेली आहे. शेगाव येथील बाळापूर मार्गावर आनंद सागरजवळ 25 एकर शेतामध्ये ही सभा होणार आहे. या सभेला जवळपास पाच ते सहा लाख लोक उपस्थित राहणार असल्याने त्यानुसार या सभेचे नियोजन करण्यात येत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते शेगाव येथे तळ ठोकून असल्याने या सभेचे नियोजन आतापासून सुरु झालेला आहे.

हजारोंच्या जनसमुदयासोबत भारत जोडो यात्रेचं मार्गक्रमण सुरु

Bharat Jodo : नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान, आज सकाळी सहा वाजता नायगाव तालुक्यातील कापशी गुंफा या ठिकाणाहून  भारत जोडो यात्रेची उत्साहात सुरुवात झाली. पावसाळा, हिवाळा या दोन ऋतुच्या जोडावर व बोचऱ्या थंडीत हजारोंच्या जनसमुदायासह भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करत आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी विविध घटकातील लोकांना भेटून संवाद साधत आहेत. यात्रा आज नांदेड शहरात 10 वाजण्याच्या सुमारास पोहोचेल. त्यानंतर देगलूर नाका, बाफना टी पॉईंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले पुतळा या  प्रमुख रस्त्यावरून व चौकातुन मार्गक्रमण करत संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा घेत आजचा या यात्रेचा टप्पा संपेल.

राहुल गांधी यांच्या पदयात्रेला नांदेडच्या लोहामधून सुरुवात, राष्ट्रवादीचे नेते होणार सहभागी

Bharat Jodo : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज 64 वा आणि महराष्ट्रातील आज चौथा दिवस आहे. सकाळी सहा वाजल्यापासून राहुल गांधी यांच्या पदयात्रेला नांदेडच्या लोहा येथून सुरूवात झाली आहे. आज या यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार  जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार सहभागी होणार आहेत.

नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, यूके न्यायालयातील नीरव मोदीची याचिका फेटाळली

नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, यूके न्यायालयातील नीरव मोदीची याचिका फेटाळली

शरद पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत, सुप्रिया सुळेंची माहिती...

Bharat Jodo :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राहुल गांधींच्या भारत जोडोा यात्रेत सहभागी होणार नाहीत, याबाबतची माहिती त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) एबीपी माझाला दिली आहे. शरद पवार जरी सहभागी होणार नसले तरी इतर काही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.  प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार सहभागी होणार नाहीत, असे सुळे म्हणाल्या. 

भाजपकडून भारत जोडो यात्रा थांबवण्याचा प्रयत्न, जयराम रमेश यांचा आरोप

 Jairam Ramesh : भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरु झाली आहे. ही यात्रा कितीही अडचणी आणि अडथळे आले तरी काश्मीर जाणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी व्यक्त केला. नायगावमध्ये जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. भारत जोडो मुळे काँग्रेस संघटनेला नव संजीवनी मिळाली आहे. भारत जोडो यात्रेविषयी भाजप नेहमीच टीका टिप्पणी करत आहे. ही यात्रा थांबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही रमेश यांनी केला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर (Modi government) टीका केली. 

साडेतीन तासानंतर भारत जोडो यात्रेचे आजचे सकाळचे सत्र संपले, शंकरनगर ते नायगाव असा 12 किमीचा प्रवास पूर्ण

Bharat Jodo :  साडेतीन तासानंतर भारत जोडो यात्रेचे आजचे सकाळचे सत्र संपले आहे. शंकरनगर ते नायगाव असा 12 किमीचा प्रवास पूर्ण झाला आहे. नायगाव येथील कुसुम मंगल कार्यालयात पहिला विश्राम होणार आहे. आता 4 वाजता ही यात्रा आजच्या दुसऱ्या टप्प्यात मार्गक्रमण करणार आहे. 

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नायगावात दाखल, स्वागतासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांची गर्दी

Bharat Jodo :  राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील पदयात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. सकाळी सहा वाजता ही पदयात्रा सुरु झाली आहे. सव्वा तीन तासांचा पायी प्रवास करून ही यात्रा  नायगावमध्ये दाखल झालेली आहे. नायगावमध्ये कुसुम लॉन्स याठिकाणी आजचा सकाळच्या सत्रातील पहिला विश्राम असणार आहे. त्यानंतर चार वाजता ही यात्रा पुढे मार्गक्रमण करणार आहे. नायगावमध्ये राहुल गांधी दाखल होताच रस्त्याच्या दोन्हीही बाजूला मोठ्या प्रमाणावर नागरिक महिला या ठिकाणी त्यांच्या स्वागताला जमलेल्या होत्या. अशोक चव्हाण, अमर राजूरकर असतील हे सर्वजण नायगावात त्यांचे स्वागत केल. आता ही पदयात्रा पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी कुसुम लॉन्स याठिकाणी होल्ट करणार आहे. 

भारत जोडो यात्रेत पुणे काँग्रेसच्या महिलांचा सहभाग, हातात हम दो हमारे दो चे फलक

Bharat Jodo : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा तिसरा दिवस सुरू आहे. या यात्रेमध्ये आज पुणे शहर काँग्रेसच्या काही महिला सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या हातात फलक आहेत. या फलकावर हम दो हमारे दो, बेरोजगारी, महागाई याबाबतचे सर्व डिटेल्स दिले आहेत. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हम दो हमारे दो ची संकल्पनाच त्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. 

हिंमत असेल तर आजच्या प्रश्नांवर बोलून दाखवावं, जयराम रमेश यांचं भाजपला थेट आव्हान

Bharat Jodo : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी या यात्रेमध्ये काँग्रेस नेते जयराम रमेश तसेच माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हेही सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर आजच्या प्रश्नांवर बोलून दाखवावं असं रमेश यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आज बेरुळ घाटातून तरुणाईसह राहुल गांधींची पदयात्रा सुरु आहे. 


 

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी कोळी बांधवही दाखल

BharatJodo : भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील आज तिसरा दिवस आहे. दरम्यान ही यात्रा कृष्नूर ते नांदेड मार्गक्रमण करत असताना आज सकाळपासून राहुल गांधी यांनी शेतकरी, शेतमजूर, बचत गटांच्या महिला, विद्यार्थी यांची भेट घेऊन बातचीत केली. दरम्यान, या सर्व यात्रेत सामील झालेल्या कोळी बांधवांच्या कुटुंबांनी लक्ष वेधून घेतलं. मुंबईहून भारत जोडो यात्रेत दाखल झालेले कोळी बांधवांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. हातात मासळीची प्रतिकृती घेऊन भारत जोडो यात्रेत कोळी बांधव सामील झाले आहेत. त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. 

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांशी राहुल गांधींनी साधला संवाद

Bharat Jodo  : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आज तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवशी शंकरनगरहून ही यात्रा नायगावकडे रवाना होत आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी अनवाणी पायाने या यात्रेत सहभागी झालेल्या कस्तुरबा गांधी विद्यालयातील शिक्षक महादेव किशन रेड्डी यांच्याशी  बराच वेळ चर्चा केली. ज्यामध्ये खासगीकरण, मुलींचे शिक्षण, रेशन धान्य वाटप यासह अनेक मुद्द्यावर संवाद साधलंय त्यांचे प्रश्नही समजून घेतले. 

भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधींनी घेतली शेतकऱ्याची भेट
Bharat Jodo : भारत जोडो यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. सकाळी 6 वाजता गुलाबी थंडीत ही यात्रा मार्गक्रमण करत आहे. दरम्यान भारत जोडो यात्रा पादाक्रांत होत असताना राहुल गांधी हे सर्वसामान्य नागरिक, मजूर, विद्यार्थी ,शेतकरी यांच्या भेटीगाठी करत, अडचणी ऐकून घेत आहेत. आज सकाळी  या यात्रेत राहुल गांधी यांनी ऐका शेतकऱ्याची भेट घेतली. त्याच्या खांद्यावर हात टाकून आस्थेनं शेतकऱ्याची  विचारपूस केली.
भारत जोडो यात्रेचा राज्यातील तिसरा दिवस, यात्रा शंकर नगरकडून नायगावकडे रवाना

Bharat Jodo : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील पहिलं सत्र सकाळी सहाला सुरु झाले आहे. ही यात्रा शंकरनगर ते पुढे नायगावकडे रवाना झाली आहे.  

Bharat Jodo : भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी पोलिसांची दोन  खास पथके 

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून सुरू आहे. राहुल गांधी यांच्या सोबत चालण्यासाठी पोलिसांची दोन विशेष पथकं तयार करण्यात आलेले आहेत. ही दोन पथकं एक दिवस एक आणि दुसऱ्या दिवशी दुसरे पथक असं राहुल गांधी यांच्या बरोबर दोन्ही सत्रांमध्ये चालणार आहेत. या पोलीस पथकामध्ये तरुण पोलीस अधिकारी कर्मचारी आहेतच. शिवाय महिला पोलीसही सहभागी आहेत. हे सर्वजण राहुल गांधींच्या समोर चालत आहेत. 

Bharat Jodo : भोपळा येथील शोक सभा आटोपून राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा दिवस पूर्ण

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या आजच्या दिवसाचा प्रवास संपला आहे. नांदेडमधील भोपळा येथील कॉर्नर सभा होणार होती, पण राष्ट्रीय सेवा दलाचे समन्वयक कृष्णकुमार पांडे यांचे निधन झाल्याने कया ठिकाणी शोकसभा घेण्यात आली आणि प्रवास थांबवण्यात आला. 

Bharat Jodo : राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी पारंपरिक पोशाखात मुलींची हजेरी

महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून अनेक मुली तुळशीचं झाड त्याचबरोबर श्रीफळ घेऊन राहुल गांधींच्या स्वागतासाठी थांबले आहेत. त्याचबरोबर अनेक शाळकरी मुलीसुद्धा राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव करून महाराष्ट्राच्या विषयावर राहुल गांधी यांचं स्वागत करताना एक युवक दिसतोय.

Bharat Jodo : राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी पारंपरिक पोशाखात मुलींची हजेरी

महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून अनेक मुली तुळशीचं झाड त्याचबरोबर श्रीफळ घेऊन राहुल गांधींच्या स्वागतासाठी थांबले आहेत. त्याचबरोबर अनेक शाळकरी मुलीसुद्धा राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव करून महाराष्ट्राच्या विषयावर राहुल गांधी यांचं स्वागत करताना एक युवक दिसतोय.

Bharat Jodo : भारत जोडो यात्रेमुळे महाराष्ट्र काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल: विश्वजित कदम 

भारत जोडो यात्रेच्या पहिल्या दिवशी दुपारच्या विश्रांतीनंतर भारत जोडो यात्रेतील उत्साह कायम आहे. गॅस दर वाढ, पेट्रोलची दरवाढ विरोधातील बॅनर घेऊन विश्वजीत कदम समोर निघाले आहेत. भारत जोडो यात्रेमुळे महाराष्ट्र काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. 

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन, पाहा व्हिडिओ

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन


 


Bharat Jodo Yatra: आज होणारी पत्रकार परिषद रद्द, आज शांततेत पदयात्रा निघणार; काँग्रेस नेत्याच्या निधनानंतर पक्षाचा निर्णय

Bharat Jodo Yatra: काँग्रेस सेवादलाचे नेते कृष्णकुमार पांडे यांच्या निधनामुळे आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दिली आहे. आज पदयात्रा शांततेत निघणार असून कोणतेही गीत वाजवले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Bharat Jodo Yatra: राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांचा आज शंकर नगर येथे मुक्काम

Bharat Jodo Yatra In Maharashtra: भारत जोडो यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. सोमवारी रात्री देगलूर येथे राहुल गांधीनी मुक्काम केल्यानंतर आज ते शंकर नगर येथे पोचतील. तिथेच त्यांचा आणि यात्रेकरूंचा मुक्काम असणार आहे. मुक्कामासाठी असलेले  अनेक कंटेनर हे देगलुरहुन शंकर नगरच्या दिशेने निघाले आहेत.

Bharat Jodo Yatra : नांदेडच्या वणाळीपासून भारत जोडो पदयात्रेला सुरुवात, तरुणांचा प्रतिसाद

Bharat Jodo Yatra : नांदेडच्या वणाळीपासून भारत जोडो पदयात्रेला सुरुवात, तरुणांचा प्रतिसाद


Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेत्याचे निधन, सेवादलाचे नेते कृष्ण कुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा दरम्यान आज नांदेड जिल्ह्यातील अटकलीमध्ये काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. 'भारत जोडो यात्रे'चे झेंडा तुकडीचे संचालन केले. त्या दरम्यान त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता, त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेमधून दवाखान्यात दाखल केले. त्यावेळी त्यांचे दुःखद निधन झाले. कॅम्पमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच. के. पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी श्रद्धांजली वाहली.

Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील पदयात्रा वनरगा येथे दाखल

Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील पदयात्रा वनरगा येथे दाखल झाली. दुपारची विश्रांती इथेच असणार आहे. आज दुसऱ्या सत्रातील पदयात्रा दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे. 

Bharat Jodo Yatra: नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी नेतेही पदयात्रेत सहभागी

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दुसऱ्या दिवशी देगलूर तालुक्यातील वनाळी येथील गुरुद्वारापासून सुरू झाली आहे. या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणाई दिसत आहे. त्यासोबतच आज राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, नसीम खान आदी नेते पायी चालत आहेत. 

Bharat Jodo Yatra: राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणावर तरुणाई सहभागी

Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणावर तरुणाई सहभागी झाली आहे. नांदेडमधील देगलूर येथून महाराष्ट्रातील हा टप्पा सुरू झाला. 

Bharat Jodo Yatra: युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी पदयात्रा मार्गातून बाहेर काढले

Bharat Jodo Yatra: युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी पदयात्रा मार्गातून बाहेर काढले. पोलीस आणि कुणाल राऊत यांची बाचाबाची झाली. पदयात्रा वनाळी गुरुद्वाऱ्याच्या पुढे जात असताना हा प्रकार घडला.

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल, असा आहे राहुल गांधी यांचा आजचा कार्यक्रम

Bharat Jodo Yatra: कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. हजारो मशाल हाती घेऊन खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वतात निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. क्लिक करा वाचा सविस्तर...



 

पार्श्वभूमी

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra :   राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज विदर्भातील तिसरा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा 11 वा दिवस आहे. आज ही यात्रा अकोला जिल्ह्यात असून सकाळी सहा वाजता पातूर येथून  या यात्रेला सुरुवात झाली आहे. वाळेगाव मार्गे ही यात्रा बाग फाटा इथे पोहोचणार आहे. बाळापूर तालुक्यातील बाग फाटा इथे आज यात्रेचा मुक्काम असणार आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे.


काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज 69 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा आजचा नववा दिवस आहे. राज्यात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे. 


काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज 68 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा आजचा आठवा दिवस आहे. राज्यात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे. काल ही यात्रा हिंगोलीच्या कळमनुरी शहरात दाखल होती. आज ही यात्रेचा कळमनुरी शहरालगत असलेल्या सातव कॉलेजच्या मैदानात थांबली आहे. आजचा दिवस यात्रेचा याठिकाणी विश्रांती असणार आहे. 


काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) 66 वा दिवस, तर महाराष्ट्रातील यात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. राज्यात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ही यात्रा काल नांदेड जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे. दरम्यान आज, सकाळी  ही भारत जोडो यात्रा दाती फाटा येथून कळमनुरीच्या दिशेने निघाली आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी कोल्हापूरवरुन (Kolhapur) दहा हजार नागरिक हिंगोलीत दाखल झाले आहेत. सर्व नागरिक लाल फेटे बांधून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.


काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) (11 नोव्हेंबर) 65 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा पाचवा दिवस आहे. ही यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात पोहोचणार आहे. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. दुपारी चार वाजता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यात्रेत उपस्थिती लावणार आहे. सकाळी 6 वाजता अर्धापूर, नांदेड येथून यात्रेला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजता सकाळचा ब्रेक होईल. त्यानंतर दुपारी 4  वाजता चोरंबा फाटा, हिंगोली येथून पुन्हा पदयात्रेला सुरुवात होणार आहे.


काँग्रेस खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज 64 वा आणि महराष्ट्रातील आज चौथा दिवस आहे. सकाळी सहा वाजल्यापासून राहुल गांधी यांच्या पदयात्रेला नांदेडच्या लोहा येथून सुरूवात झाली आहे. दुपारी चार वाजता देगलूर नाका येथून पुन्हा पदयात्रेला सुरूवात होईल. संध्याकाळी सहा वाजता न्यू मुंडा मैदान येथे राहुल गांधीची सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार  जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार हे आज या यात्रेत सहभागी होणार आहेत.


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील पहिलं सत्र सकाळी सहाला सुरु झालं आहे. गुलाबी थंडीत राहुल गांधी यांनी सहा वाजता ही यात्रा सुरू केली आहे. शंकरनगर ते पुढे नायगाव लॉन्स या ठिकाणी पहिला टप्पा असणार आहे. चार वाजल्यानंतर दुसरं सत्र सुरु होणार आहे. सध्या राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चालतात. इतर नेतेही त्यांच्यासोबत चालत आहेत. 


कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. हजारो मशाल हाती घेऊन खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वतात निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात नांदेडमधील देगलूर येथे दाखल झाली आहे. यावेळी त्यांच्या सोबत हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ज्यांच्या हातात मशाली होत्या. या यात्रेचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जंगी स्वागत केले. 


सकाळी 8.30 वाजल्यापासून राहुल गांधी यांची पदयात्रा गुरुद्वारापासून सुरू झाली. राज्यातल्या नांदेड,हिंगोली,वाशीम,अकोला आणि बुलढाणा अश्या ५ जिल्ह्यातून 14 दिवस हि यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. 


या यात्रेत आघाडीतले शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे दोन नेते सहभागी होणार की नाही याची चर्चा सूरू आहे. बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सध्या आजारी असलेले शरद पवार या यात्रेत सहभागी होणारं आहेत. शिवसेनेने मात्र ठाकरे पिता पुत्राच्या सहभागाबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. 


देगलूरहून ही यात्रा निघाल्यानंतर देगलूर ते नांदेड हा मार्ग 7 ते 12 नोव्हेंबर 5 दिवस हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. नांदेड मधील जवळपास 9 मार्गावरील वाहतूकही वळवण्यात आली आहे. यात्रा सुरळीत व्हावी यासाठी 300 अधिकारी, दीड हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील रस्ते साफसफाई तसेच प्रमुख रस्त्यावरील दुभाजकांना रंगरंगोटीचे काम केले जात आहे. मागील आठ दिवसापासून दोन एकर खुल्या मैदानाची सफाई करण्यात आली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.