मुंबई: राहुल बजाज यांनी बजाज टू व्हीलरच्या माध्यमातून गरीब आणि मध्यमवर्गीय समाजामध्ये क्रांती आणली असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. राहुल बजाज यांच्या निधनामुळे भारताने एक उद्योगपती, मानवतावादी कार्य करणारा, तरूण उद्योगपतींसाठीचा दीपस्तंभ अन् 'हमारा बजाज' गमावला असंही ते म्हणाले.
ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, "पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने आपल्याला धक्का बसला आहे. स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांच्या या नातवाने समाजामध्ये विशेषत: गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनात बजाज टू व्हीलरच्या माध्यमातून एक मोठी बदल घडवून आणला. याच 'हमारा बजाज'ने समाजामध्ये एक मोठा सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व भारतीय त्यांच्या ऋणामध्ये राहतील."
शरद पवार पुढे म्हणाले की, "माझ्या जवळच्या मित्राच्या निधनाने आपल्याला दु:ख झालं आहे. भारताने एक उद्योगपती, मानवतावादी आणि तरुण उद्योगपतींसाठी असलेला मार्गदर्शक गमावला. हमारा बजाज."
उपमुख्यंत्री अजित पवारांची श्रद्धांजली
बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग जगतातील पितामह हरपला आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून भारताला ऑटो उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधन हे भारतीय सामाजिक, उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
संबंधित बातम्या: