Radhakrishna Vikhe Patil : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) महाविकास आघाडीत भीती बसली आहे. कारण, लाडकी बहीण योजना आमच्या प्रत्येक बहिणीच्या मनात घर करुन बसली आहे. या योजनेवरुन कोणी कितीही टीका केली तरी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आमचे सरकार बांधील असल्याचे मत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केलं. तसेच यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका देखील केली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली होती. तर सुप्रिया सुळे यांनी योजनेचा पहिला हफ्ता बँकेत जमा झाला आहे, तो सर्व बहिणींनी लवकर काढून घ्यावा नाहीतर भाजपचा एक नेता म्हणाला आहे की, पैसे परत घेतले जातील. असं म्हणत या योजेवरून सरकारवर टीका केली होती. याबाबत पालकमंत्री विखेंना विचारले असता त्यांनी मविआ नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
बारामतीत सुनेत्रा पवारांना लोकसभेला उभे केले हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत असल्याची’चर्चा असल्याचे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलं होतं. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांनी वक्तव्य करणं थोडं थांबवलं पाहिजे. प्रत्येक वेळी अपरिपक्तवतेचं विधान येतं आहे. ते स्वतःच हसू करुन घेत असल्याचा टोला राधाकृष्ण विखे यांनी लगावला.
नितेश राणेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले विखे पाटील?
पोलिसांना लय मस्ती चढली असेल तर त्याला अशा ठिकाणी पाठवू की बायकोलाही फोन करता येणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे यांनी काय वक्तव्य केले मला माहित नाही. मात्र, प्रत्येक नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे थांबवले पाहिजे असं विखे पाटील म्हणाले. असं वक्तव्य केलं असेल तर त्याच समर्थन कोणी करणार नाही असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं आहे.
विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण
देशभरात आज 78 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अहमदनगर येथे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. विखे पाटील यांनी आपल्या भाषणात देशात सरकारच्या वतीने राबवल्या जात असलेल्या योजना सांगितल्या. तसेच सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस दलातील विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं.
महत्वाच्या बातम्या:
लाडकी बहिण योजनेचे पैसे यायला सुरुवात, पहिल्या टप्प्यात किती महिलांना मिळणार लाभ? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती