RSS Chief Mohan Bhagwat on Bangladesh: भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज (गुरूवारी) सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात (महाल परिसरातील मुख्यालय) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी बोलताना आपल्या शेजारील बांगलादेशात सुरू असलेल्या अराजकतेवर देखील भाष्य केलं आहे. बांगलादेशातील हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणं एक देश म्हणून आपली आणि सरकारची जबाबदारी आहे. सरकार हे करेलच, मात्र त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबा ही आवश्यक आहे, असं डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी म्हटलं आहे. (RSS Chief Mohan Bhagwat on Bangladesh)


देशासाठी चिंतन करण्याचा आजचा दिवस आहे. पण फक्त चिंतन करून चालणार नाही. 1857 पासूनच्या संघर्ष चालला, त्यानंतर आपण स्वातंत्र्य मिळविले. त्यामुळे स्वातंत्र्याच्या नायकांची मोठी संख्या आहे. त्यात अहिंसक आंदोलनापासून क्रांतिकारक यांचा समावेश आहे. मात्र, हेच नायक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले. तर सामान्य नागरिक ही तेव्हा देशासाठी रस्त्यावर उतरले होते. प्रत्येकाने वाटा उचलला. देशासाठी बलिदान करणारा समूह आणि त्यांच्या पाठीशी उभा असलेला समाज या कारणामुळेच आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळवून देणारी पिढी तर निघून गेली, मात्र आजच्या पिढीवर स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 


आपल्या स्वातंत्र्य देशासाठी आम्ही जे मार्ग निवडले आहे, त्यावर चालणे आवश्यक आहे, त्यासाठी घटनात्मक नियमांचे पालन करणे गरजेचं असल्याचंही डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी यावेळी सांगितलं आहे. 




बांगलादेशमधील परिस्थितीवरती केलं भाष्य


शेजारील देशात (बांगलादेश) उत्पात होत आहे. तेथील हिंदू बांधवांना त्याचा त्रास होत आहे. भारताने कधी कोणावर आक्रमण केले नाही, संकटात असलेल्यांना कायमच मदत केली. तो देश आपल्याशी कसं वागला हे भारताने पाहिले नाही, गरजेच्या काळात भारताने कायमच मदत केली.अराजकता असलेल्या देशांमध्ये असलेल्या हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणं एक देश म्हणून आपली आणि सरकारची जबाबदारी आहे. सरकार मदत करेलच, मात्र, त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबा ही आवश्यक आहे, अंसही त्यांंनी यावेळी म्हटलं आहे.


देशात योग्य वातावरण निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.. त्यासाठी आपण (समाजाने) आपल्या जीवनातील छोट्या छोट्या समस्यांचे उपाय शोधले पाहिजे, असंही यावेळी डॉ. मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. देशात आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. यानिमित्त राज्यात देखील ध्वजारोहण केले जात आहे. नागपुरातील संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी संबोधित केलं.