परभणी : साप, अजगर हे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त घटक आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सर्पमित्र प्रयत्न करत असतात. मात्र परभणीत एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका 15 फूट अजगराला चक्क जेसीबी व कुऱ्हाडीचे वार करून ठार करत त्याच्यासोबत फोटो काढण्यात आले आहेत.
परभणीच्या मानवत तालुक्यातील बोंदरवाडी शिवारात एका शेतात 15 फुटांचा अजगर आढळला. हा अजगर पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यातील काही जणांनी सर्पमित्रांना फोन केले मात्र त्याठिकाणी सर्पमित्र पोहचेपर्यंत यातील जमलेल्या काही अतिउत्साही गावकऱ्यांनी जेसीबी, कुऱ्हाडीच्या सहाय्याने अजगरावर वार करून त्याची हत्या केली. महत्त्वाचे म्हणजे त्याला मारल्यानंतर अनेकांनी त्याच्यासोबत फोटोसेशन ही केले आहे. ही गंभीर बाब सर्पमित्र चेतन लांडे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केल्याने समोर आली आहे.
दरम्यान सर्पमित्र चेतन लांडे यांची पोस्ट चांगलीच वायरल झाली असून या बाबत अजून तरी ना पोलिसांनी दखल घेतली आहे ना वन विभागाने. हा अजगर मागच्या अनेक दिवसांपासून या परिसरात दिसत होता. त्यामुळे गावकरी शेतात जाण्यास भीत असल्याने, केवळ भीतीपोटी त्याला मारण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra COVID-19 lockdown Guidelines | राज्य सरकारचं Mission Begin Again; रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी
- महाराष्ट्रात कोरोनानंतर उन्हाचा तडाखा; मुंबई, सोलापूर, अकोला, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यात पारा चढला
- 'MPSC परीक्षेसाठी आंदोलन केलेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता'