Pune Weather :  पुण्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना कोरेगाव पार्क, मगरपट्टा, वडगावशेरी, चिंचवड, लवळे या काही भागात इतर भागांच्या तुलनेत तापमानात वाढ झाली आहे.  पुण्यातील बदलत्या हवामानामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून दिवसा आणि रात्रीच्या तापमानात चढ-उतारांसह पुन्हा तापमानात वाढ झाली असून त्यामुळे नागरिकांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे.


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 19 एप्रिल रोजी कोरेगाव पार्क येथे 43.3 अंश सेल्सिअस, वडगावशेरी येथे 41.9 अंश सेल्सिअस, चिंचवड येथे 41.5 अंश सेल्सिअस, लवळे येथे 40.9 अंश सेल्सिअस, शिवनगर येथे 40.8 अंश सेल्सिअस, शिवनगर येथे 40.8 अंश सेल्सिअस तापमान होते. तर 12  एप्रिल रोजी कोरेगाव पार्क येथे 41.9  अंश सेल्सिअस, वडगावशेरी येथे 41 अंश सेल्सिअस, चिंचवड येथे 40.1 अंश सेल्सिअस, मगरपट्टा येथे 39.8 अंश सेल्सिअस, पाषाण येथे 38.9 अंश सेल्सिअस, शिवजीनगर येथे 38 अंश सेल्सिअस तापमान होते.


8 एप्रिल रोजी कोरेगाव पार्क येथे 37.6 अंश सेल्सिअस, वडगावशेरी येथे 35.6 अंश सेल्सिअस, चिंचवड येथे 35.7 अंश सेल्सिअस, मगरपट्टा येथे 35 अंश सेल्सिअस, पाषाण येथे 33.9 अंश सेल्सिअस, एनजीनगर येथे 34.9 अंश सेल्सिअस, शिवजीनगर येथे 34.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पुण्यातील सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. तापमानाने ही मर्यादा ओलांडल्यावर खबरदारी घेणे आवश्यक आहे. 


लहान मुलांची काळजी घ्या...


पुण्यात सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. याचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना ताप, सर्दी आणि खोकल्याच्या समस्या जाणवत आहेत. मात्र खोकला फार काळ टिकत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय लहान मुलांनाही खोकल्याचा त्रास होत असल्याने पालकही त्रस्त झाले आहे. या सगळ्यांच नीट निरीक्षण करा आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 


उन्हात जाताना कोणती काळजी घ्याल?


-फार महत्वाचं काम नसल्यास घराबाहेर पडू नये.
- कापडी स्कार्फ बांधूनच घराच्या बाहेर पडा.
- पुरेसं पाणी पित रहा.
-सुती कपड्यांचा वापर करा
-उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिऊ नका.
-उपाशीपोटी घराबाहेर पडू नका
-तळलेले आणि तुपकट पदार्थ टाळा.
-गॉगल, टोपी, रुमाल, छत्री यांचा वापर करा.


संबंधित बातमी-


Kharghar Heat Stroke : खारघर घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती, एका महिन्यात अहवाल सादर होणार