Pune Traffic : पुणे शहरातील सर्वच भागातील (Pune Traffic) रस्‍त्यांना खड्डे पडून वाहनचालकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. भर पवसात पुणेकरांना वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागत आहे. पुण्यातील वाहतूक पोलीस विभागाने आता अशी 135 ठिकाणं शोधून काढली आहेत जिथे खड्डे आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या दोन्ही गोष्टी कमी होतील आणि नागरिकांना प्रवास सहजतेने व्हावा यासाठी वाहतूक पोलीस यांनी उपाययोजना राबवण्याचे ठरवले असून महापालिकेला पत्र देखील दिले आहे.


मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणेकरांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे आणि पुण्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे हे या वाहतूक कोंडीला कारणीभूत आहे. त्यामुळे पुणे वाहतूक शाखेने शहरातील विविध भागातील 135 ब्लॅक स्पॉट शोधून काढले आहेत. त्या ब्लॅक स्पॉटवर काम करण्यात येणार आहे.


पुणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील विविध भागातील लोक पुण्यात स्थायिक झाले आहे. त्यामुळे पुणे शहरातील लोकसंख्येत मोठी भर पडली आहे. पुण्यात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त असल्याचं समोर आलं आहे. वाहतूक कोंडी होण्यास जास्त वाहनांची संख्या कारभूत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


रस्त्यांवर ब्लॉक घेणार...


पुण्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यावर उपाययोजना राबवण्याचे ठरवलं आहे. तसे आदेशही महापालिकेला देण्यात आले आहे. त्यानुसार हे रस्ते ओळखून त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. काही वेळाचा रस्त्यांवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा ब्लॉक घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. 


सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज...


पावसामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचतं त्यामुळे वाहतूक कोंडी होते. गाड्यांचं प्रमाणही मोठं असतं. वाहतूक कोंडीतून सुटका करायची असेल तर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक वाहतूक कशी सक्षम करता येईल, वेगवेगळ्या उपाययोजना कोणत्या, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. 



खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी...


पुणे बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगदा ते वारजे पूल दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. याच खड्ड्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण होते आहे. दरवर्षी हे सगळे खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो. मात्र दरवर्षी पुण्यात या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते आणि पुन्हा एकदा महापालिकेचा भोंगळ कारभार समोर येतो. वाहतूक कोंडीच्या तक्रारी पुणेकर ट्विटरच्या माध्यमातून करत आहे. त्यावर महापालिकेकडून आपली तक्रार नोंदवली असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्रवर कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा दुरुस्ती होत नसल्याचं समोर आलं आहे. 


 हेही वाचा-


Pune NIA News : पुण्यात NIA मोठी कारवाई; ISIS मध्ये भरती करण्याची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला अटक