Pune NIA News : एनआयएने पुण्यात मोठी (NIA )कारवाई केली आहे. इसिसच्या रिक्रुटमेंटची जबाबदारी असलेला डॅाक्टरला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या कोंढवा परिसरातून अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ISIS महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयएसआयएसशी संबंधित अनेक दस्तऐवज यासारख्या अनेक दोषी साहित्य जप्त करण्यात आल्याचे एनआयएने म्हटले आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात छापा टाकून डॉ. अदनान अली सरकार (43) याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कोंढव्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ISIS शी संबंधित अनेक दस्तऐवज जप्त केले आहेत. हे डॉक्टर पुण्यातील तरुणांना प्रेरित करून आणि संघटनेमध्ये भरती करत असल्याचं समोर आलं आहे.
एनआयएच्या तपासानुसार, सरकार देशाची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. पुण्यात इंजिनियरला अटक केल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली होती. त्यानंतर ही पाचवी अटक करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्यानंतर 3 जुलै 2023 रोजी NIA ने इतर चार जणांना मुंबईत अटक केली होती. मुंबईतील तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख,अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी त्यांची नावे आहेत.
PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या पाच जण दहशतवादी कारवाई करण्याचा कट रचत होते. त्यात ISIS बरोबरच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि शाम खोरासान (ISIS-K) या संस्थांचादेखील समावोश होता.
रत्नागिरीतील एका दहशतवाद्याची चौकशी सुरु
काही दिवसांपूर्वी देशाविरोधी कृत्य केल्याने पुण्यात दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. आता पुन्हा एकाला रत्नागिरीतून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. हे. दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याच्या संशय ATS ला आहे. गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या नवी मुंबई युनिटने या व्यक्तीला पकडलं असून त्याची चौकशी सुरु आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तसंच या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचं आढळल्यास त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्याने नमूद केलं.
गोंदियातून एकजण ताब्यात
त्यासोबतच गोंदियाच्या रामनगरातील एका 35 वर्षाच्या तरुणाला पुणे पोलिसांनी गोंदिया पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेत पुणे येथे रवाना केले. पुणे गुप्तचर यंत्रणेची माहिती गोंदिया पोलिसांना आली. गोंदियाच्या पोलिसांनी व गुप्तचर यंत्रणेने त्या 35 वर्षाच्या तरुणाचे घर गाठून त्याला ताब्यात घेत पुण्याला रवाना केले. त्याची कसून चौकशी पुणे येथे सुरू असल्याची माहिती आहे. परंतु नक्की तो दहशतवादी कारवायांत सहभागी आहे काय हे अजूनही समोर आलेले नाही. काही दिवसांपूर्वी पुणे येथे दोन दहशतवादी आढळले होते. त्याच घटने संदर्भात चौकशीसाठी या तरुणाला पकडण्यात आले आहे. अब्दुल कादिर पठाण (35) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा-
Maharashtra ATS ने चौकशीसाठी रत्नागिरीतून एकाला उचललं, पुण्यातील संशयित दहशवादी प्रकरणात कारवाई