पुण्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आणि वाऱ्यामुळे हडपसरजवळ रेल्वे रुळांवर मोठ मोठे पोस्टर पडले. शिवाय रेल्वे रुळांवर पाणी साचलं होतं. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.
दरम्यान रात्री उशिरा दोनच्या सुमारास पोस्टर बाजूला हटवून तसंच साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्याने आता वाहतूक पूर्वपदावर आली आहे.