चंद्रपूर: एखाद्या अभयारण्य अथवा व्याघ्र प्रकल्पात तुम्ही पर्यटक म्हणून गेला आणि तुमच्या समोर वाघांची झुंज झाली तर? अशा प्रकारचे अनेक व्हिडीओज आपण सोशल मीडियावर पाहतो. मात्र चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांच्या जिप्सीपुढेच हा बाका प्रसंग ओढवला.

व्याघ्र दर्शनासाठी आलेल्या एका कुटुंबाच्या जिप्सीपुढे चक्क २ वाघोबा झुंजले आणि मग जो काही थरार अनुभवायला मिळाला तो शब्दांच्या पलीकडला होता.

दरम्यान, मागच्याच वर्षी एका व्याघ्रप्रकल्पातील वाघानं थेट जिप्सी कारपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी सुदैवानं कोणत्याही व्यक्तीवर या वाघानं हल्ला केला नव्हता. दरम्यान आजच्या या  घटनेनं पर्यंटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

VIDEO :