Shambhuraj Desai : पुण्यामध्ये विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराने पोर्शे कारने कल्याणीनगर परिसरात दोघांना चिडून मारल्यानंतर पुण्यातील पब संस्कृती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील पब संस्कृती आक्रमक पवित्रा घेत पुण्यातील एक्साईज कार्यालयार वसुली कार्ड वाचून दाखवल होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारला सुद्धा आक्रमक भूमिका घ्यावी लागली आहे. 


उत्पादन शुल्क विभागाची तातडीची बैठक बोलावली


उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना यांनी आज (30 मे) उत्पादन शुल्क विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. दुपारी एक वाजता पावनगड बंगल्यावर आयुक्त कार्यालयातील महत्त्वाच्या पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये आणखी कारवाईचा वेग वाढवण्यात येणार आहे. 


आतापर्यंत 70 पब्सवर कारवाई करण्यात आली


या बैठकीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये किती कारवाई करण्यात आली, किती अनधिकृत पब आहेत, याची सुद्धा माहिती घेण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्यात पब संस्कृतीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर आतापर्यंत 70 पब्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अबकारी विभागाकडून आता नाईट लाइफ संदर्भात नवीन नियमावली आणण्याची शक्यता आहे.  मिळालेल्या माहितीनुसार एक्साईज विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भरती सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या