पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी आता नवनव्या (Pune Porsche Car Accident) लोकांची नावं पुढे येत आहे. ससून रुग्णालयाकडे संशयाची सुई असतानाच आता या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचं समोर आलं आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरूनच डॉ. अजय तावरे याची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली, अशी कबुली थेट ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंनी दिली. त्यानंतर थेट विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून ससूनच्या कारभारामध्ये राजकीय हस्तक्षेप दिसून येत आहे. त्यात आता या प्रकरणातदेखील राजकीय हस्तक्षेप असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या ससूनच्या कारभारातील राजकीय हस्तक्षेप कधी थांबणार किंवा या प्रकरणी सरकार ठोस भूमिका कधी घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्ती संदर्भातदेखील त्यांनी मोठा खुलासा केला आहे. डॉ. तावरे यांच्या अधीक्षक पदाची नियुक्ती आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती. तावरे हे त्यावेळी प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती करावी, असं पत्राद्वारे सांगितलं होतं. त्यानंतर तावरेंच्या नियुक्तीचा आदेश निघाला होता, असं काळेंनी थेट सांगितलं. हसन मुश्रीफांनी तावरेंना नियुक्ती दिली होती. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीला मी जबाबदार नाही, असं काळेंनी स्पष्ट केलं.
डॉ. अजय तावरे यांनी यापूर्वी ससूनमध्ये अनेक कारनामे केले आहे. मागील सतरा वर्षा कोणत्याना कोणत्या कारणावरुन ते चर्चेत आले. शिवाय त्यांची बदली करण्यात आली. तरीदेखील ते ससूनमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे परत आले. यावेळीदेखील त्यांनी राजकीय लोकांचा वापर करुन ससूनमध्ये नियुक्ती मिळवली होती. तावरेंचे कारनामे सरकारसाठी काही नवीन नाही आहे. ससूनमधील किडनी तस्करी प्रकरणातदेखील त्यांच्यावर आरोप झाले होते. तरीदेखील त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती.
अजय तावरे, श्रीहरी हरनोळ निलंबित; 'ससून'चे डीन विनायक काळे सुद्धा सक्तीच्या रजेवर
ब्लड सॅम्पल फेकून देऊन लाच खाणाऱ्या डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोर यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने निलंबन करण्यात आले आहे. शिवाय महत्वाचे म्हणजे बी जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे (Vinayak Kale) यांना देखील तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला.
इतर महत्वाची बातमी-