Pune political News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून (अजित पवार गट) पुण्याचे (Pune political News) माजी उपमहापौर दिपक मानकर यांची पुणे शहराध्यक्षपदी (NCP Pune City President) निवड करण्यात आली आहे. दिपक मानकर यांना त्याबाबतचे नियुक्तीचे पत्रदेखील देण्यात आलं आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर पुण्यासह राज्यातील अनेक कार्यकर्त्यांपुढे नेमका कोणाला पाठिंबा द्यावा, असा प्रश्न पडला. त्यात पुण्यातील शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांना शरद पवारांना पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष कोण असेल?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर आता दिपक मानकर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


अजित पवारांच्या उपस्थितीत मानकरांना पत्र देत आणि पुष्पगुच्छ देत त्यांची नियुक्ती करण्यात आली प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिपक मानकर यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. अजित पवार, सुनिल तटकरे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी दिपक मानकर यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे अजित पवारांच्या जवळचे मानले जायचे. मात्र दिपक मानकर हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जायचे. मात्र रविवारी अजित पवारांनी राजकीय भूकंप केला आणि भाजप सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांना पाठिंबा दिल्यामुळे अजित पवारांच्या गटाला  शहराध्यक्षपदासाठी नवा चेहऱ्याच्या शोधात होते. त्यात पुण्यातील काही नावांची चर्चा होती. मात्र दिपक मानकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. 



कोण आहेत दिपक मानकर?



- दिपक मानकर हे पुण्याचे माजी उपमहापौर होते.
- मानकर यापूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. त्यावेळी पुण्यात नगरसेवकदेखील होते. 
-2014 साली त्यांनी राष्ट्रवादी क़ॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 
-दिपक मानकर यांना गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. 
-पुण्यातील एका पोलिसाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
-या प्रकरणानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. ते एक वर्ष तुरुंगात होते. 
- त्यांच्यावर मोक्का कारवाईदेखील करण्यात आली होती. 


 


जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची अजित पवारांनाच पसंती



पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे अजित पवारांच्या गोटात सामील झाले आहेत. पुणे महापालिकेच्या 44 नगरसेवकांपैकी 38 ते 40 अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिह्यातील कार्यकर्त्यांची अजित पवारांनाच पसंती आहे. 


 


हेही वाचा-