Amit shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) हे पुणे दौऱ्यावर आहे. त्यांच्या सुरक्षा यंत्रणेकडून मोठी सुरक्षा तैनात असताना त्यांच्या ताफ्यात एक संशयित तरुण शिरला. या प्रकाराची माहिती आयबीला मिळताच टीमने हेरले आणि पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा असल्याचे सांगून ताफ्यात शिरला होता. 


सोमेश धुमाळ  असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण मुख्यमंत्री आणि खासदार शिंदे यांच्याकडे असल्याचे सांगून ताफ्यात शिरला. त्याने स्थानिक पोलिसांना चकवा दिला मात्र अमित शाहंच्या ताफ्यांच्या सोबत असलेल्या पोलीस यंत्रणेला हा संशयित असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर स्थानिक पोलिसांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली . स्थानिक पोलिसांनी या तरुणाचा पाठलाग करत त्याला गाठलं. चतुर्श्रुंगी पोलीस सोमेशला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देत आहेत. जेडब्ल्यू मॅरेट हॉटेल मधून घेतलं या संशयिताला ताब्यात घेण्यात आलेलं आहे.


तरुण नेमका कोण?
सोमेशला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोमेश नेमका का ताफ्यात शिरला? तो नेमका कोणाच्या गाडीत बसला? ताफ्यात शिरुन तो नेमंकं काय करणार होता? या सगळ्याचा पोलीस तपास करत आहेत. 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुणे विमानतळ येथे स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुणे विमानतळ येथे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुकत् शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.