पुणे : पुण्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याच दडीहंडी उत्सवाची पुण्यात तयारी सुरु झाली आहे. त्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागात लाखोंच्या संख्येनं पुणेकर एकत्र येत असतात. त्यामुळे 7 सप्टेंबर रोजी पुण्यातील मध्यवर्ती भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन पुणेकरांना करण्यात आलं आहे. टिळक रस्ता, अलका टॉकीज चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता या रस्त्याने वाहतूक वळवण्यात आली आहे.


वाहन चालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा



  • छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटला ( Swargate) जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने ( Jangli Maharaj Road) खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता किंवा लाल बहादूर शास्त्री रस्त्याने इच्छित स्थळी जावे.

  •  पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगर (Shivajinagar) कडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्ता, अलका टॉकीज चौक (Alka Talkies Chowk), फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने (FC Road) पुढे जावे. तसेच पुरम चौकातुन सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जावे.

  • स. गो. बर्वे चौकातून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने महापालिकेकडे (PMC) जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.

  • बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे (Appa Balwant Chowk) एकेरी वाहतुक सोडण्यात येणार आहे.
    आप्पा बळवंत चौकातुन बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी जातील.

  • रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्गाचा
    वापर करावा.

  • सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रस्त्याने सरळ सेवासदन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
    वाहनचालकांनी सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळुन फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जावे.

  • शिवाजी रोडवरुन जिजामाता चौकातून गणेश रोडने दारुवाला पुलाकडे जाणारी वाहतूक हि गाडगीळ पुतळा येथून
    डाव्या बाजूने कुंभारवेस चौक- पवळे चौक- जुनी साततोटी पोलीस चौकी मार्गाने इच्छित स्थळी जातील

  • गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक ही दारुवाला पुल येथून बंद करण्यात येणार आहे. तसेच देवजीबाब चौक व फडके हौद
    चौकात वाहतूक बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी अपोलो टॉकीज, नरपतगिरी चौक, दारूवाला पूल,
    दुधभट्टी या मार्गाचा वापर करावा.


इतर महत्वाची बातमी-


Pune PMPML : दहीहंडीनिमित्त पुण्यातील PMPML बस मार्गात बदल; कसे असतील पर्यायी मार्ग?