पुणे : पुण्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याच दडीहंडी उत्सवाची पुण्यात तयारी सुरु झाली आहे. त्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागात लाखोंच्या संख्येनं पुणेकर एकत्र येत असतात. त्यामुळे 7 सप्टेंबर पुण्यातील मध्यवर्ती भागातील PMPML बससेवा वळवण्यात आली आहे. एका दिवसासाठी बस मर्गात बदल करण्यात आला आहे. तर काही मार्गांवरच्या बसेस बंद ठेण्यात आल्या आहेत.
कसे असतील पर्यायी मार्ग?
- बसमार्ग क्र. 50: शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरून संचलनात राहतील.
- बस मार्ग क्र. 113: अ.ब. चौक ते सांगवी या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर म.न.पा. भवन स्थानकावरून संचलनात राहतील.
- बस मार्ग क्र. 8, 9, 57, 94, 108, 143, 144, 144 अ या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता डेक्कन जिमखाना, म.न.पा. भवन, गाडीतळ (जुना बाजार) या मार्गाने संचलनात राहतील.
- मार्ग क्र. 174: 6 आणि 7 सप्टेंबर रोजी रस्ता बंद झाल्यानंतर गाडीतळ (जुना बाजार) म.न.पा., डेक्कन मार्गे संचलनात राहील.
- बस मार्ग क्र. 2 , 2 अ, 10, 11, 11अ, 11 क, 13, 13 अ, 28, 30 , 20, 21, 37, 38, 88, 216, 297, 298, 354, रातराणी-1, मेट्रो शटल-12: या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर शिवाजीनगरकडुन स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रोड, डेक्कन, टिळक रोड मार्गे संचलनात राहतील. मात्र स्वारगेटकडुन शिवाजीनगरला जाताना वरील मार्गावरील बसेस मार्गाने बाजीराव रोडने संचलनात राहतील.
- बस मार्ग क्र. 7, 197, 202: या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
- बस मार्ग क्र. 68: या मार्गाचे बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
- स्वारगेट आगाराकडुन बस मार्ग क्र. 3 आणि 6 : हे दोन बस मार्ग दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येईल.
मार्गांमध्ये बदल केल्यामुळे अनेक नागरिकांना प्रवासासाठी त्रास होऊ शकतो किंवा त्यांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागू शकते. त्यांना होणाऱ्या त्रासासाठी PMPML प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, पीएमपीने केलेल्या बदलाला नागरिकांनी सहकार्य करावं, असंही आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.
पुण्यात दहीहंडी उत्सवाचा जल्लोश
पुण्यात दहीहंडी उत्सवाचा जल्लोश प्रत्येक चौकाचौकात दिसून येतो. पुण्यातील बाजीराव रोड, मंडई, बाबूगेनू हे पुण्यातील मोठे दहीहंडी मंडळं आहेत. त्याशिवाय पुण्यातील विविध चौकात अनेक कार्यकर्त्यांकडून दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. लाखो लोक हा उत्सव पाहण्यासाठी घराबहेर पडतात मात्र यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तदेखील तैनात करण्यात येतो.
इतर महत्वाच्या बातम्या :
Pune PMPML : बस चालकांची अरेरावी चालणार नाही! पुणेकरांनो 'या' नंबरवर तक्रार करा अन् मिळवा...