पुणे : अनैतिक संबंधातून पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. सांगवी ढोरेनगर परिसरात मंगळवारी (16 एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. अशोक बिरादार असं मयत प्रियकराचे तर लक्ष्मण खुटेकर असं आरोपीचे नाव आहे.
अशोक बिरादार हा व्यवसायाने ड्रायव्हर आहे. त्याचे आणि आरोपी लक्ष्मण खुटेकर यांची ओळख होती. अशोकचे लक्ष्मणच्या घरी येणं जाणं होत असे. लक्ष्मण घरी नसतानाही तो अशोकच्या घरी वारंवार जात असे.
प्रियकर अशोक हा मंगळवारच्या रात्री साडेआठच्या सुमारास प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. महिलेच्या पतीला म्हणजेच लक्ष्मणला याचा सुगावा लागताच तो घरी आला. पत्नीचे विवाहबाह्य संबंधांमुळे संतापलेल्या अशोकने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
यात अशोकचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. यानंतर लक्ष्मणने घरातून पळ काढला. राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारी असताना सांगवी पोलिसांनी रात्री उशिरा लक्ष्मणला बेड्या ठोकल्या आहेत.
पुण्यात अनैतिक संबंधांमुळे कोयत्याने वार करुन पत्नीच्या प्रियकराची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Apr 2019 04:35 PM (IST)
प्रियकर अशोक हा मंगळवारच्या रात्री साडेआठच्या सुमारास प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. महिलेच्या पतीला म्हणजेच लक्ष्मणला याचा सुगावा लागताच तो घरी आला. पत्नीचे विवाहबाह्य संबंधांमुळे संतापलेल्या अशोकने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -