Pune: लहानग्यांना घेऊन पर्यटनाला जाणाऱ्या पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्याच्या (Pune) लोणावळ्यात (Lonavala) आणखी एका बालकाचा जलतरण तलावात (swimming pool) बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यातील जलतरण तलावामुळं (swimming pool) तीन बालकांचे जीव गेले आहेत. त्यामुळेच लोणावळ्यातील जलतरण तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धक्कादायक म्हणजे शहरात पाचशे जलतरण तलाव अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या (Pune) लोणावळ्यात दोन वर्षीय चिमुकलीचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला आहे. डोंबिवलीतील (Dombivli) सय्यद कुटुंबीय लोणावळ्यात पर्यटनासाठी (Tourism) आलं होतं. तेंव्हा एका खाजगी रिसॉर्टमध्ये हे कुटुंबीय नाश्ता करत होतं. तेंव्हाच हानियाझैरा सैय्यद ही दोन वर्षीय चिमुरडी तिसऱ्या मजल्यावर पोहचली आणि तिथल्या जलतरण तलावात पडली. जीव वाचविण्यासाठी ती आकांताने ओरडली आणि अख्ख कुटुंब तिच्या दिशेने धावलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. 


गेल्या सहा महिन्यामध्ये लोणावळ्यात तीन बालकांचा असाच जीव गेला आहे 



  • जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात दोन वर्षीय चिमुरड्याचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. 

  • 29 जुलैला जलतरण तलावातून खेळून बाहेर पडलेल्या 13 वर्षाच्या बालकाचा विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू झाला.

  • 27 नोव्हेंबरला हानियाझैराला ही जलतरण तलावात बुडाल्याने जीव गमवावा लागला. या अशा घटनांमुळे स्थानिकांसह पर्यटक ही संतप्त झाले आहेत. 



एकामागोमाग एक घटना घडल्यानं लोणावळ्यातील (Lonavala) जलतरण तलावांच्या (swimming pool) सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात हजारभर जलतरण तलाव असून त्यातील पाचशे तलाव अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यांच्यावर आता प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्नही आता संतप्त नागरिक विचारात आहेत. दरम्यन, धो-धो बरसणारा पाऊस आला किंवा गुलाबी थंडीची चाहूल पडली की प्रत्येकाचे पाऊल लोणावळ्याकडे वळतात. पण इथल्या त्रुटी पर्यटकांच्या खासकरून लहानग्यांच्या जीवावर बेतू लागल्यात. या त्रुटींकडे प्रशासनाने असंच अक्षम्य दुर्लक्ष केलं तर पर्यटननगरी ओस पडू शकते. परिणामी इथल्या आर्थिक चक्राला ही खीळ बसू शकते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Pune SPPU Atharvashirsh Course : अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाला चंद्रकांत पाटील यांचं समर्थन तर हरी नरके, छगन भुजबळ यांच्याकडून तीव्र विरोध