Pune crime : प्रेमात कोण कधी काय करेल याचा काही नेम (Pune Crime News ) नाही. त्यात जर प्रेमाला नकार दिला तर त्याचा बदला घेण्यासाठीदेखील अनेक तरुण वेगवेगळे प्रयत्न करतात. पुण्यातदेखील एकतर्फी प्रेमातून एका पठ्ठ्याने अजबच प्रकार केल्याचं समोर आलं आहे. एकतर्फी प्रेमातून युवतीच्या दुचाकीसह तीन दुचाकी पेटविल्याची घटना लोहगाव भागात घडली. या प्रकरणी एका युवकास विमानतळ पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी युवकाच्या साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


श्रीराम घाडगे (रा. वाघोली, नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी घाडगे याच्या साथीदाराच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत युवतीच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवती आणि आरोपी घाडगे एकाचमहाविद्यालयात शिकत आहेेत. घाडगे युवतीवर एकतर्फी प्रेम करत होता. तिने मुलाला नकार दिला आणि तो तिला त्रास देत असल्याने युवतीने या घटनेची माहिती वडिलांना दिली. युवतीच्या वडिलांनी घाडगेला समज दिली होती.


घाडगे आणि साथीदार युवती राहत असलेल्या सोसायटीच्या आवारात मध्यरात्री आले. त्यांनी युवतीची दुचाकी पेट्रोल ओतून पेटवून दिली. शेजारी लावलेल्या दोन दुचाकी पेटवून घाडगे आणि साथीदार पसार झाले. याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.त्यानंतर पोलिसांनी तपास करून घाडगेला पकडले. याप्रकरणी विमानतळ पोलिस तपास करत आहेत.


यापूर्वी रागाच्या भरात पेटवल्या होत्या गाड्या...


काही दिवसांपूर्वीदेखील अशीच एक घटना पुण्यातून समोर आली होती. त्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिली म्हणून थेट गाड्याच पेटवल्या होत्या. यामुळे गाड्यांचं नुकसान झालं होतं.पुण्यातील कोंढवा भागातून हा अजब प्रकार समोर आला होता. 4 दुचाकी, 1 चार चाकी आणि एका रिक्षाला आग लावली होती. यात काही गाड्या जळून खाक झाल्या होत्या तर इतर गाड्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं. टेरेन्स डॉमिनिक जॉन असे या व्यक्तीचे नाव होतं. पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिली त्यामुळे टेरेन्सचा राग अनावर झाला. त्याने आपल्याच पत्नीची गाडी पेटवण्याचं ठरवलं आणि गाडी पेटवली. त्यानंतर पुन्हा राग आल्याने त्याने पार्किंगमधील इतरांच्या गाड्याही पेटवल्या. यामुळे सोसायटीतील अनेकांच्या गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय त्यात एक रिक्षाही असल्याने तिचंही नुकसान झालं आहे. त्यामुळे इतर नागरिकांनी त्यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला होता.