Pune Crime news : सध्या सगळीकडे रॅपरचा जमाना आहे. (Pune Crime News) त्यात अश्लील शब्द वापरुन काहीतरी हातवारे करुन रॅप तयार केले जातात. त्या रॅपला अनेक लोक पसंतीदेखील देतात. मात्र शिक्षणाच्या माघेरघर असलेल्या पुण्यात आणि पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या समोर एका तरुणांना अश्लील शब्द असलेलं रॅप गाणं गायले. या रॅप गाण्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी चतु:र्श्रुंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. शुभम जाधव असं या तरुण रॅपरचं नाव आहे. त्याने केलेल्या या कृत्यामुळे प्रशासनाने संताप व्यक्त केला आहे. 


विद्यापीठाच्या तक्रारीनंतर चतुर्श्रुंगी पोलिसांनी संबंधित रॅपरला चौकशीसाठी बोलावलं आहे. या तरुणाची आता चौकशी केली जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील उडी घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून या रॅपर तरुणाला पाठिंबा दिला आहे. तसेच पुणे पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचा आरोप ही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. विद्यापीठाच्या तक्रारी सोबतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देखील चतु;र्श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


ट्विटमध्ये अव्हाड यांनी काय लिहिलंय?
 


या सगळ्यात जितेंद्र आव्हाडांनी तरुणाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी या संदर्भात ट्विटदेखील केलं आहे. ट्विटमध्ये ते लिहितात की, "शुभम जाधव या रॅपरला चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनं पुणे यांनी ताब्यात घेतले आहे. जसे मला  याबद्दल समजले तसे मी शुभमला फोन केला. शुभमने समोर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला माझा फोन आहे, असं सांगितले. समोरच्या पोलीस कर्मचाऱ्याने उद्धटपणाने मला बोलायचे नाही, असे उत्तर दिले. शुभमला मी सांगितले की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा नंबर मला काढून दे. तर शुभमने त्यांना विचारले असता पोलीस कर्मचारी म्हणाला की माझे वरिष्ठ अधिकारी मोकळे नाहीत ते काही कोणाशी बोलणार नाहीत. मी शुभमला म्हटलं फोन खाली ठेवून दे. एकतर बेकायदेशीररित्या पोलीस स्टेशनला बसवायचे, काहीही चुकी नसताना गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीनी फोन केला तर जा फोन घेत नाही जा, असं उद्धटपणाने उत्तर द्यायचे याला काय म्हणायचं? शुभम हा बौद्ध समाजातील मुलगा असून आंबेडकरी चळवळीत काम करतो", असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.