Supriya Sule : सासरच्या लोकांनी जादुटोण्यासाठी मासिक पाळीचं रक्त विकल्याची धक्कादायक घटना घडली त्यानंतर अनेकांनी संपात व्यक्त केल्या यावर लोकप्रतिनिधींनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. मागील सहा महिन्यात गुन्हेगारीच प्रमाण अधिक प्रमाणात वाढलं आहे. सर्व घटना लक्षात घेता गृह मंत्रालयाचं अपयश आहे. असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली.
त्या आज पुण्यातील महापालिकेत आल्या होत्या कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आणि त्यासोबतच त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की मागील सहा महिन्यात गुन्हेगारीच प्रमाण अधिक प्रमाणात वाढलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोयता गँग सारख्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर आल्या. त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता गृह मंत्रालयाच अपयश आहे. सासरच्या लोकांनी मासिक पाळीचं रक्त विकल्याच्या आघोरी प्रकारावर सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे.
... तर आंदोलन करु!
पुणे शहरात बारामती विधानसभा मतदारसंघाचा काही भाग येतो. अजित पवार यांनी पालकमंत्री असताना या भागातील पाणी, रस्ते, कचरा प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे काम केले होते. मात्र ही सर्व कामे आता बंद करण्यात आली आहेत. काम न झाल्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी दर शुक्रवारी प्रशासनासोबत बैठक होत असे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती मिळाली होती. मात्र आता ती व्यवस्था नसल्याने सर्व यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळे आम्हाला दर महिन्याला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घ्यावी लागते. तसेच एकही नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य नाहीत. त्यामुळे अधिकारी व नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व घटना घडत असून, निवडणुका होतील, असे चित्र नाही. तसेच पूर्वीच्या पालकमंत्र्यांना भेटण्याची पद्धत होती. आता अशी कोणतीही यंत्रणा नसल्याने सातत्याने महापालिका आयुक्तांकडे जावे लागते. भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर खासदार सुळे यांनी अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला.