पुणे : पुण्यात महिला सुरक्षित नसल्याच्या घटना आतापर्यंत (Pune Crime News)  समोर आल्या आहेत. मात्र पुण्यात पोलीसच असुरक्षित असल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील एका पोलीस शिपायाने ओळख वाढवून महिला पोलीस कर्मचारीला गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केला आहे. या दरम्यान या महिला पोलिसाचा अश्लील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आणि पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर महिला पोलिसाने थेट शिपायाविरोधात पोलिसांत घाव घेतली आणि तक्रार दाखल केली. दीपक मोघे असं या कर्मचाऱ्यांचं नाव आहे. 


शिपाई आणि महिला पोलीस कर्मचारी हे दोघांची पुणे शहर पोलीस दलात कार्यरत आहे. ते दोघेही पोलीस वसाहतीत रहायला आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत आरोपी दीपक मोघे याने फिर्यादीशी ओळख वाढविली. या काळात त्यांच्या घरी जेवायला तो येत होता. दरम्यान त्याने कोल्ड्रिंकमधून महिलेला गुंगीचं औषध दिलं. त्यामुळे उलट्या आणि त्रास होत असल्याने फिर्यादी महिला पोलीस कर्मचाऱ्याला त्याने गोळ्या खाण्यास दिल्या. त्यामुळे आणखी गुंगी येऊन फिर्यादीला झोप लागली. झोप लागल्यावर महिला कर्मचाऱ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.  


अश्लील व्हिडीओ देखील काढला...


या सगळ्याचा शिपायाने व्हिडीओ तयार केला. महिलेला हा प्रकार समजताच तिने जाब विचारल्यावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. शिवाय पतीला ठार मारण्याचीही धमकी दिली. महिला पोलिसाला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घरातील कपाटातील 5 ते 6 तोळे वजनाचे सोन्याचे दागिनेही चोरले. लॅपटॉप, डोंगल आणि मोबाईल अशा सर्व वस्तू जबरदस्तीने घेऊन गेला. या संपूर्ण त्रासाला कंटाळून शेवटी महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलिसांत तक्रार केली. 


यापूर्वीही असाच प्रकार पुण्यातून समोर आला होता. पुस्तक खरेदी करण्यासाठी पुण्यात आलेल्या तरुणीला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. एवढंच नाही तर त्या मुलीला विवस्त्र करुन तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 16 लाख 86 हजार रुपये उकळले होते. या प्रकरणी 27 वर्षीय तरुणीने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या होत्या.


हेही वाचा


Pune Crime news : स्वत:च्या घरातच मुली असुरक्षित, बापानंच केले आश्लील चाळे, मुलीने विरोध करताच दिले गरम इस्त्रीचे चटके