Pune Crime News : जनावरांचे दूध (Milk) वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे दिल्या जाणाऱ्या औषधाच्या कारखान्यावर छापा टाकण्यात (Pune Crime) आला आहे. पुणे (Pune) पोलिसांनी (Pune Police) हा सगळा प्रकार उघडकीस आणून 52 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त (seize) करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि औषध विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
समीर अन्वर कुरेशी (वय 29, रा. कलवड वस्ती, लोहगाव), बिश्वजीत सुधांशु जाना (वय 44, रा. पुरबा बार, विलासपुर, पुरबा मदीनीनपुर, पश्चिम बंगाल), मंगल कनललाल गिरी (वय 27, तिराईपूर, पश्चिम बंगाल), सत्यजीत महेशचंद्र मोन्डल (वय 22, रा. नबासन कुस्तीया पंचायत, पश्चिम बंगाल) आणि श्रीमंता मनोरंजन हल्दर (वय 32, रा. नलपुरकुर, मंडाल,पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पुण्यातील लोहगाव परिसरातील कलवड वस्तीत गाई, म्हशीच्या दुधात वाढ होण्यासाठी ऑक्सिटॉसिन वापर मोठ्या प्रमाणत सुरु होता. या औषधाचा बेकायदा साठा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. या पथकाने "एफडीए'च्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली होती. पत्र्याच्या शेडमध्ये काही पुठ्यांच्या खोक्यात हा औषधांचा साठा केला आहे, अशी माहिती उघडकीस आली होती. या सगळ्याची माहिती मिळताच शनिवारी लोहगावमधील कलवड वस्ती तेथे छापा टाकला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
औषध विक्रेते आहोत असं सांगत केली होती विक्री
पाचही जणांची टोळी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश मधून आलेली होती. काही दिवसांपासून ही टोळी पुण्यात वास्तव्यास होती. या टोळीने औषध विक्रेता असल्याचे सांगत अनेकांना औषध विकले होते. फसवणूक, प्राण्यांना अमानुष वागणूक देणे, अशा अनेक कलामानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळीने नेमकं कोणाकोणाला औषध विकले आहेत, याचा तपास सुरू आहे.
नागरिकांच्या जीवाला धोका
ऑक्सिटॉसिन हे एक हार्मोन इंजेक्शन असून महिलांना प्रसूतीच्या वेळेस दिले जाते. तसेच त्याचा वापर केल्याने जनावरांकडून अधिकचं दूध प्राप्त होतं. मात्र हे दूध नागरिकांसाठी हानिकारक असल्याने त्याच्यामुळे विविध रोग पसरू शकतात. यामुळे श्वसनाचे आजार, लहान मुलांमध्ये कावीळ, महिलांचा गर्भपात अशा अनेक गंभीर आजारांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते. या औषधाच्या विक्रीने नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कारखान्यावर तातडीने कारवाई करण्यात आली आहे.