पुणे : पुण्यात गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही. (Pune Crime News)   भररस्त्यात हत्या केल्याची बातमी ताजी असतानाच पुन्हा एकदा भररस्त्यात तुंबळ हाणामारीत टोळक्याने तरुणाचा खून केल्याची घटना धक्कादायक घटना घडली. त्यामुळे पुण्यातील  रस्त्यांवर नेमकं चाललंय काय?  आणि पुणे पोलीस नेमकं काय करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


कौटुंबिक वादातून दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत टोळक्याने तरुणाचा खून केल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील वानवडी येथील सय्यदनगरमध्ये रात्री घडली. गर्दीच्या वेळी भररस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट खळबळ उडाली होती. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. अजीम शेख उर्फ अंत्या (वय 35) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.


16 ऑगस्ट रोजी रेहान खान उर्फ नन्नू हा भजी घेण्यासाठी गेला होता. याच ठिकाणी आमिर खान याच्याशी एकमेकाकडे बघण्यातून वाद झाला. त्यातून आमिर खान याने त्याचे मित्र बोलावले, तर रेहानने देखील अल्ताफ वजीर शेख यास बोलावून घेतले. त्यानंतर मध्ये रात्री साडेदहा वाजता त्यांच्यात भांडण झालं होतं. हेच भांडण सोडवण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र आले होते. त्याही वेळी वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला आणि एकमेकांवर कोयते घेऊन भिडले आणि एकाची हत्या केली. 


चित्रपट पाहून निघाला अन् टोळीनं हल्ला केला...


पुण्यात चाकूने वार करत तरुणाची दहा ते बारा जणांनी मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना पुण्यातील मंगला टॉकीज (Mangla Talkies Pune) परिसरात 15 ऑगस्ट रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास घडली होती. चित्रपट पाहून बाहेर (Murder Case) पडताना या तरुणावर वार करण्यात आले होते. नितीन मस्के (Nitin Maske) असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव होतं. या प्रकरणी पोलिसांनी थेट कारवाई चार जणांना अटक केली आहे आणि बाकी काहींचा शोध सुरु आहे.


गुन्हेगारी कधी थांबणार?


मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. कोयता गॅंगची दहशत शहरात संपायचं नाव  घेत नाही आहे. शहरात अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी दहशत पसरवण्याचं काम करतात. त्यांच्यावर पोलिसांनी आतापर्यंत अनेकदा कारवाई केली आहे. मात्र तरीही त्यांचे कारमाने सुरुच असल्याचं घडलेल्या घटनांमधून समोर येत आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Bhatghar Dam News : रिसॉर्टच्या चुकीच्या बांंधकामामुळे बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू; जलसंपदा विभागाकडून भोरचं सीमा रिसॉर्ट थेट पाडण्यात येणार?