Pune Crime news : नवऱ्याच्या विवाहबाह्य (pune Crime) संबंधांना कंटाळून विवाहितेनं (Suicide) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील (Pune) हडपसर (Hadapasar) भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात कौटुंबिक (Domestic Violence) हिंसेच्या प्रकारात सातत्याने वाढ होत आहे. यात हिंसेला कंटाळून अनेक महिलांनी आयुष्य संपवल्याच्या घटना समोर येत आहे. 


नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे रोज मानसिक (Mentally harassment) आणि शारीरिक छळ व्हायचा. या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं आहे. राहत्या घरातच महिलेने गळफास लावून घेतला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती आनंद बधे, रंजना बधे, कल्याण बधे (सर्व रा. संकेत विहार, फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हर्षदा आनंद बधे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.


या प्रकरणी हर्षदा हिची बहिण वर्षा राहुल शिवरकर  हिने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा प्रकार मे 2022 ते 10 फेब्रुवारी 2013 च्या दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची बहीण हर्षदा हीचा आनंद बधे याच्याबरोबर विवाह झाला होता. लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून आरोपींनी संगनमत करुन तिला शिवीगाळ करुन मारहाण करीत. आनंद बधे याचे विवाहबाह्य संबंध होते. त्याविषयी हर्षदाने विचारणा केल्यावर तिचा शारीरीक आणि मानसिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून हर्षदा हिने 10  फेब्रुवारी रोजी सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक खळदे अधिक तपास करीत आहेत.


आत्महत्येत वाढ


पुण्यात आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यासोबतच कौटुंबिक हिंसाचारात देखील वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेतून शिंदे गटात दमदार एन्ट्री घेतलेले नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केली होती. विष प्राशन करुन त्यांच्या पत्नीने आत्महत्या  केली होती. पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.1 फेब्रुवारीला  राहत्या घरात पत्नीने विष प्राशन केलं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र 2 फेब्रुवारीला दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 


संबंधित बातमी:


Nagpur Crime : लग्नासाठी प्रियकराचा नकार, दुखावलेल्या प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल...