Pune Koyta Gang : पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गँगच्या (Koyta gang) दहशतीत वाढत होताना दिसत आहे. अनेकांच्या मुसक्या आवळून देखील कोयता गँगचा हैदोस संपताना दिसत नाही आहे. पुण्यात कोयता गँगने हल्ला केल्याच्या दोन घटना समोर आल्या (Pune crime) आहेत. पहिल्या घटनेत पुण्यात कोयत्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिकाला गंभीर जखमी केलं आहे तर लग्नामध्ये नाचताना झालेल्या वादातून चार जणांनी तरुणावर कोयत्याने वार केले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर जवळ मैदानवर झोपलेल्या नागरिकावर काही तरुणांनी कोयत्याने हल्ला केला. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन या तरुणांनी ज्येष्ठ पती-पत्नीवर कोयत्याने खुनी हल्ला केल्याची माहिती आहे. फिर्यादी सतीश काळे यांचे काही तरुणांसोबत चार महिन्यापूर्वी किरकोळ कारणातून बाचाबाची झाली होती. या भांडणाचा राग मनात धरत चौघांनी मिळून काल रात्री हल्ला केला. दाद्या बगाडे, दीपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर या चौघांवर शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सतीश भीमा काळे हे आपल्या पत्नी आणि मुलाबाळासह शिवाजीनगर भागात असलेल्या एका मैदानावर रात्री झोपले असता टोळक्याने आलेल्या आणि हातात कोयते ह घेऊन जोरजोरातून हल्ला करुन परिसरात दहशत माजवत कोयता टोळीने हल्ला केला. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.


लग्नामध्ये नाचताना झालेल्या वादातून चार जणांचा तरुणावर कोयत्याने वार


दुसऱ्या घटनेत लग्नामध्ये नाचताना झालेल्या वादातून चार जणांनी तरुणावर कोयत्याने वार केले आहेत. कोयत्यासह, हॉकी स्टिक आणि बांबूने मारहाण केली आहे. पुण्यातील हडपसर परिसरात ही घटना घडली आहे. हा प्रकार 15 जानेवारी रोजी घडला होता. अमरदीप जाधव (वय 19 वर्षे) यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे


फिर्यादी तरुण हा सोलापूर जिल्ह्यात जेऊर या ठिकाणी डिसेंबर महिन्यात एका लग्नासाठी गेला होता. लग्नावेळी फिर्यादी तरुण आणि यातील मुख्य आरोपी अमरदिप जाधव हे दोघे ही नाचत होते. नाचताना या दोघांमध्ये भांडण झाले आणि याचा राग जाधव याच्या मनात होता. पुण्यात 15 जानेवारी रोजी जाधव याच्यासह तीन जणांनी फिर्यादी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केले तसेच त्याला हॉकी स्टिक आणि बांबूने मारहाण केली आणि तिथून पसार झाले. सागर सुकळे (वय 22 वर्षे) याच्यासह तीन अनोळखी तरुणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत