Pune Crime News : पुण्यातून पुन्हा एकचा मुलींच्या जीवाला धोका असल्याची बातमी समोर आली आहे. 22 वर्षीय तरुणी पुण्यातून बेपत्ता झाली आहे. लग्न झाल्याचे लपवून तरुणाने एका 22 वर्षीय तरुणीने डोळ्यावर पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी पळवून नेले आहे. पुण्यातील चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून खळबळजनक घटना समोर आली आहे. सैफ नावाच्या व्यक्तीने या तरुणीला पळवून नेत्याचं समजत आहे. त्यामुळे हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचं बोललं जात आहे. 


लग्नाचं आमिष दाखवून एका 22 वर्षीय तरुणीला सैफ नामक तरुणाने पळून नेले, मात्र पळून गेल्यानंतर प्रियकर विवाहित असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने आपण परत येत असल्याचे आपल्या मैत्रीला फोन करुन लोकेशन सुद्धा पाठवले. मात्र ही तरुणी अद्यापही परतलेली नाही. चंदननगर पोलिसांनी सैफ (पूर्ण नाव माहित नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये काम करणारी तरुणी आणि ही 22 वर्षे तरुणी पेईंग गेस्टमध्ये राहतात. या तरुणीचे एका सैफ नामक व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. आरोपी सैफने लग्न करण्याच्या आमिषाने तिला पळून नेले. परंतु पळून गेल्यानंतर आपला प्रियकर आधीच विवाहित असल्याचे या तिला लक्षात आले. सैफने तिच्या डोळ्याला पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी आणले असून तेथे बरेच लोक आहेत मी तुम्हाला गुपचूप लोकेशन पाठवत आहे, असे सांगून त्या तरुणीने तिच्या मैत्रिणीला नोएडा दिल्ली येथील लोकेशन पाठवले. मात्र ती अद्याप परतलेली नाही. घटनेची गंभीरता लक्षात घेता पुणे पोलिसांची एक टीम दिल्ली येथे रवाना करण्यात आली आहे.


मुली बेपत्ता, गेल्या कुठे?


मागील काही दिवसांपासून पुण्यातून अनेक मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकट्या पुणे जिल्ह्यातून तब्बल 447 महिला बेपत्ता झाल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील मुलींची ही संख्या आहे. या सर्व महिला आणि मुली 16 ते 25 वर्षे वयोगटातील आहेत. विविध कारणांमुळे मुली बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं आहे. त्यात अनेक मुलींना पळवून नेल्याचं देखील अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असून त्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 


संबंधित बातमी-


Pune Crime News : सामूहिक अत्याचाराने पुणे हादरलं! तीन नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 'गुड टच बॅड टच' उपक्रमात मुलीने शिक्षकांना सांगितला प्रकार